फॅबटेकच्या बाळकृष्ण आसबे या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील बाळकृष्ण रावसाहेब आसबे या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या मल्टि नॅशनल कंपनी मध्ये निवड झाली असून ३.८ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.

कॅपजेमिनी हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेड ऑफिस पॅरिस येथे आहे. शिवाय या कंपनीचा ५० पेक्षा जास्त देशात विस्तार असून हि कंपनी सॉफ्टवेअर व सर्विस पुरविण्याचे काम करते. या कंपनीमध्ये निवड प्रक्रियेसाठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांचे कौशल्य सुधारण्यास मदत झाली. याचा फायदा या विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेमध्ये होत असल्याचे सिव्हिल इंजिनियरिंगचे विभाग प्रमुख डॉ.अभिमान कणसे यांनी सांगितले.
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली असून याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, सिव्हिल इंजिनियरिंगचे विभाग प्रमुख डॉ.अभिमान कणसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here