फॅबटेकच्या  प्रतिक मागाडे या विद्यार्थ्याची टीसीएस या नामांकित कंपनीमध्ये निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या
कॉम्प्युटर  सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्रतिक मागाडे या
विद्यार्थ्याची टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) या नामांकित
कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ आर
बी शेंडगे यांनी दिली. या  विद्यार्थ्यास वार्षिक ३.६ लाख इतके  पॅकेज
मिळाले आहे. टीसीएस ही माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली
सेवा आणि आउटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करणारी प्रख्यात
भारतीय व्यापारी संस्था आहे. अशी  माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड
इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ सोमनाथ ठिगळे यांनी दिली.

      या विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन  श्री. भाऊसाहेब रुपनर व
मॅनेजिंग  डायरेक्टर श्री अमित रुपनर  यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस
शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे  कार्यकारी संचालक  श्री दिनेश रुपनर,
कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, अकॅडमिक डीन प्रा.  तात्यासाहेब
जगताप, अकॅडमिक को-ऑर्डिनेटर प्रा. पराग दौंडे, ट्रैनिंग अँड प्लेसमेंट
अधिकारी प्रा. डॉ.  साहेबगौडा संगणगौडर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक
यांनीही अभिनंदन करून प्रतिकला पुढील कारकीर्दीस  शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here