फॅबटेकच्या प्रताप कचरे या विद्यार्थ्यांची   व्हेरॉक लाइटिंग सिस्टिम इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
फॅबटेकच्या प्रताप कचरे या विद्यार्थ्यांची   व्हेरॉक लाइटिंग सिस्टिम इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनी मध्ये निवड

 

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभागातील प्रताप कचरे या  विद्यार्थ्यांची ट्रान्सफॉर्म को या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
व्हेरॉक हि मल्टी  नॅशनल कंपनी असून या कंपनीचा विस्तार इटली, जर्मनी, अमेरिका, जपान या देशामध्ये असून हि कंपनी हेडलॅम्प  सिग्नल लॅम्प, टू  व्हिलर  लाइटिंग सारखे ऑटोमोटिव्ह पार्ट तयार करते . नॅशनल अँप्रेन्टीसशिप  प्रोमोशन स्कीम  मार्फत सदर  विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी दिली.
         

संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी निवड झालेल्या   विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे  संचालक श्री. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, मेकॅनिकल  इंजिनिअरिंग विभाग  प्रमुख प्रा संजय  पवार व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर तसेच  सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक  उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here