फॅबटेकच्या चिमुकल्यांनी घेतला बाजाराचा अनुभव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आनंदात बाजाराचा अनुभव घेतला. आई मला बाजारात येऊ दे ना….असा हट्ट करणारी शालेय मुले तर तुझे काय काम आहे बाजारात? असे आई सांगताच हिरमुसली मुले असे चित्र घरोघरी दिसते,पण आता  शाळेतच बाजाराचे व्यवहारीपणाचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी फॅबटेक शाळेने या मॅथ्स बाजारचे आयोजन केले होते. या बाजाराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा रुपनर, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह शिंदे, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे  यांच्या शुभहस्ते केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव कसा दिला जातो व भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारे चालते हे इयत्ता  सातवी व व आठवी तील विद्यार्थ्यांनी एक लघु नाटिका सादर केली. या मॅथ्स बजारसाठी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला. शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनावर आलेली कोरोना काळातील मरगळ दूर झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, स्नॅक्स, शालेय उपयोगी वस्तू, मेकअप साहित्य यांचे स्टॉल लावले होते. तसेच पाचवीपासून पुढील विद्यार्थ्यांनी  खाद्यपदार्थाचे विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. बाळगोपाळांच्‍या खरेदी-विक्रीच्या आवाजाने पूर्ण शाळेचे मैदान गजबजले. पालकांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी बाजारात खरेदी करून शाळेच्या या गुणवत्ता व व्यवहार ज्ञान वाढीच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. दोन-तीन तासाच्या बाजारात चांगली विक्री करून विद्यार्थ्यांनी स्वकमाईचा आनंद घेतला. या उपक्रमासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर आर बी शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर संजय बैस, पॉलिटेक्निक प्राचार्य श्री.शरद पवार, अकॅडमिक डीन श्री टी एन जगताप यांनी शालेय जीवनातूनच मुलांना असे व्यवहारिक ज्ञान आत्मसाद करता आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. हा मॅथ्स बजार यशस्वी करण्यासाठी कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व शाळेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभले.

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here