फॅबटेकची माजी विद्यार्थिनी राजलक्ष्मी कांबळे यांना अमेरिकेतील  वेयने या विद्यापीठाची एमएस पदवी प्रदान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला: येथील  फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मधील माजी विद्यार्थिनी राजलक्ष्मी राजू कांबळे यांना अमेरिकेतील  वेयने विद्यापीठातील एमएस पदवी प्रदान झाल्याची माहिती  कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे यांनी दिली.
राजलक्ष्मी कांबळे ही फॅबटेक मधील २०१४-१५  बॅचची इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन मधील विद्यार्थीनि  असून तिने अमेरिकेतील वेयने स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठामध्ये एमएस (इले्ट्रॉनिक्स अँड  टेलीकम्युनिकेशन) या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. या वेळेस शोध निबंध सादर करताना फॅबटेक कॉलेजमध्ये  असताना आयोजीत केलेल्या विविध रिसर्च उपक्रमाचा फायदा झाल्याचे राजलक्ष्मी कांबळे यांचे वडील राजू कांबळे यांनी सांगितले.तिने मिळविलेल्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर , कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनी अभिनंदन  करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here