प्रहार संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रहार न्यायमंच द्वारा संचालित इतर मागास व बहुजन कल्याण विभाग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हा सोलापूर जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी घोषित करण्याबाबत ..
अखिल भारतीय प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न्यायमंच संघटना राज्यभर विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या शासन दरबारी मांडून न्यायदानाचे अविरत कार्य करत आहे . संघटनेच्या अनेक उद्दिष्टापैकी राज्यभर संघटनेचा विस्तार करून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील शेवटच्या गावातील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समस्यमुक्त करणे हे सुद्धा प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे त्यानुषंगाने सोलापूर जील्ह्याबरोबरच राज्यातील अनेक जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारणी गठीत करायची होत्या मात्र राज्यभर कोरोना आणि आता नवीन व्हेरियंट ओमायक्रोन या साथरोगाच्या प्रसारणे परिस्थीती आटोक्यात येईपर्यंत राज्यभरातील जिल्हा कार्यकारणीच्या नियुक्त्या करणे तात्पुरते स्थगित केले होते .
मात्र या साथरोग सदृश्य परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या समस्यांचा वाढता आलेख आणि कर्मचारी वर्गाची मागणी पाहता स्थानिक पातळीवर समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संघटनेची जिल्हा कार्यकारणी गठीत करणे अत्यंत गरजेचे वाटल्याने संघटनेच्या झालेल्या संदर्भिय ऑनलाइन बैठकीमध्ये राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १ वर्षाच्या कालावधीसाठी त्यात्या जिल्ह्याची जिल्हा कार्यकारणी ऑनलाईन घोषित करण्यावर एकमुखाने संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचा ठराव पारीत झाल्याने आज दिनांक : ३०/०१/२०२२ रोजी zoom app द्वारे सोलापूर जिल्ह्यातील संघटनेत निस्वार्थ भावनेने कार्य करण्यास इच्छुक कर्मचारी बांधवांची बैठक घेऊन सर्वानुमते सोलापूर जिल्ह्यातील समस्यांच्या निवारणार्थ १ वर्षाच्या कालावधीसाठी *श्री अजय पाटील सर यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती* करण्यात येऊन खालील प्रमाणे सोलापूर जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात येत आहे .
१) श्री अजयकुमार आप्पासाहेब पाटील , जिल्हाध्यक्ष
२) श्री शुक्राचार्य ब्रह्मदेव ढवण , कार्याध्यक्ष
३) श्री विकास महादेव धसाडे , उपाध्यक्ष
४) श्री बाळासाहेब चंद्रकांत भंडारे , उपाध्यक्ष
५) श्री विकास विठ्ठल माने – देशमुख , सचिव
६) श्री अनिल काशिनाथ दळवे , सल्लागार
७) श्री दशरथ बबन घोलप , संघटक
८) श्री प्रा. अभिजित रामदास काशीद , प्रसिध्दी प्रमुख
९) श्री अण्णा कुशाबा चौगुले , संपर्क प्रमुख
१०) श्री मल्लिकार्जुन बाळासाहेब घिवारे , सह कार्याध्यक्ष
११) श्री शंकर थावरू चव्हाण , सह सचिव
१२) श्री हनुमंत केरू कांबळे , सह सल्लागार
१३) श्री बाळकृष्ण सुभाष मोरे , सह संघटक
१४) श्री दत्तात्रय महादेव बनसोडे , सह संपर्क प्रमुख
१५) श्री आनंद नागनाथ पाटील , सह प्रसिद्धी प्रमुख
१६) श्री सुर्यकांत गुरुलींगप्पा होसूरे , कोषाध्यक्ष
१७) श्री पद्माकर बाळकृष्ण कटकधोंड , सदस्य
१८) श्री विलास मनोहर कलाल , सदस्य
१९) श्री सुभाष सिद्धप्पा कुंभार , सदस्य
२०) श्री सुनील भारत पवार , सदस्य
२१) श्री संतोष अण्णासाहेब बेदरे , सदस्य
२२) सौ प्रमिलाताई सहदेव वाघमारे , महिला प्रतिनिधी
२३) सौ सुनिताताई रामचंद्र जाधव , महिला प्रतिनिधी
२४) सौ शशिकलाताई वसंतराव कसबे , महिला प्रतिनिधी
२५) सौ वर्षारानीताई सुनील साळुंके , महिला प्रतिनिधी
२६) सौ रीनाताई ताकमोगे , महिला प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीने संघटनेची शिस्त आणि नियमास बांधील राहून जिल्ह्यातील विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांच्या समस्या शासन , प्रशासन तथा क्षेत्रीय कार्यालयाकडे सामोपचाराने निकाली काढाव्यात आणि संघटनेचा नावलौकिक वाढवावा .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here