प्रशासकीय सेवेतील संधी यावर शुक्रवारी ऑनलाईन वेबिनार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर,दि.27 (जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त युवक-युवतींना ‘प्रशासकीय सेवेतील संधी’ याबाबत उद्योजकता जाणीव, प्रेरणा व व्यवसाय मार्गदर्शन होण्यासाठी ‘चला उद्योजक होऊ या !’ या शृंखलेअंतर्गत शुक्रवार दि. 28 जानेवारी  2022 रोजी दुपारी 3 वाजता मोफत ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या फेसबुक पेजवर (@MaharashtraSDEED) थेट ऑनलाइन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            यामध्ये वाडा, जि. पालघरचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. भवानजी आगे-पाटील,  बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त देवेंद्रकुमार जैन, जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, माजी कॅबिनेट सेक्रेटरी दिल्ली आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

            राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, कोकण भवन, नवी मुंबई यांच्यामार्फत ‘चला उद्योजक होऊ या !’ या नाविन्यपूर्ण उद्योजकता अभियानांतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यत फेसबुक पेजवर ऑनलाइन उद्योजकता मार्गदर्शन वेबिनार सुरु करण्यात आलेला आहे. या वेबिनारचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here