प्रभाग 25 येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज खंदारे यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रभाग 25 येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज खंदारे यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला

 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राघवेंद्र नगर मजरेवाडी येथील कार्यक्रमात प्रभाग 25 येथील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते धीरज अशोक खंदारे यांनी आपल्या समर्थकांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, नगरसेवक विनोद भोसले, अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष सोहेल शेख, दक्षिण सोलापूर युवक अध्यक्ष सैफन शेख, समाधान व्हटकर, निलेश व्हटकर, तिरुपती परकीपंडला, अमोल कारंडे, तसेच धीरज खंदारे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, धीरज खंदारे व त्यांचे मित्रपरिवार सारखे नवयुवक कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत हे कॉंग्रेस पक्षासाठी आशादायी चित्र आहे. युवकांचा कॉंग्रेस पक्षावरील विश्वास वाढत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेहमी सर्वसामान्य जनतेचे कामे करण्याचे आवाहन केले. मोदी सरकार सातत्याने करत असलेले पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ, युवकांची वाढती बेरोजगारी, महापालिकेचा भोंगळ कारभार, पाणी टंचाई, आदीविषयी जनतेमध्ये जागृती करावी असे आवाहन केले.

तसेच यावेळी जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
श्री बनसोडे सर यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here