प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाचा कॅप राऊंड-२ गुरुवार पासून दि. ४ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रक्रिया

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाचा कॅप राऊंड-२ गुरुवार पासून दि. ४ सप्टेंबर पर्यंत चालणार प्रक्रिया

पंढरपूर शै. वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड) गुरुवारदि. ०१ सप्टेंबर २०२२ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया रविवारदि.०४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:००  वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी डिप्लोमाच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६४३७) मध्ये ऑनलाईन कॅप राउंड साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय केली आहे. या प्रवेशाची अलॉटमेंट यादी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर  मंगळवार दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे.ज्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही त्यांना या दुसऱ्या फेरीचा लाभ घेता येईल.’ अशी माहीती श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटपंढरपूर संचलित डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.

         सन २०२२-२३ च्या पदविका अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणेभरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणीपडताळणीअर्ज निश्चित करणे आदी प्रक्रिया दिलेल्या अवधीत पार पडल्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण  झाली आहे. पहिल्या फेरीत योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी आता दुसरी फेरी असून योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम (विभाग) याबाबत चे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी नीट अभ्यास करून कॅप राऊंड – २ चे ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेशविद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकालकॅम्पस प्लेसमेंटची संख्यासोयी-सुविधाउच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे गरजेचे आहे. कॅप राउंडच्या या चार दिवसात घेतलेला निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी जागावाटप  मंगळवार दि. ६ सप्टेंबर २०२२  रोजी प्रदर्शित केले जाईल. दुसऱ्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती  बुधवार दि. ०७ सप्टेंबर २०२२ ते शनिवार दि.१० सप्टेंबर २०२२ या दरम्यान करता येईल व त्यानंतर जागा वाटप झालेल्या संस्थेत उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करण्याची मुदत बुधवार दि. ०७ सप्टेंबर २०२२ ते रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल. प्रथम वर्ष डिप्लोमाच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा.एस.एस.गायकवाड (मो.९८९०५६६२८१) व प्रा. एम.एम. मोरे (मो. ९४२१९६०२५८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पदविका अभियांत्रिकीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मिळालेल्या विक्रमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर व कॅम्पस प्लेसमेंटच्या विक्रमी आघाडीवर स्वेरीमध्ये अभूतपूर्व गर्दी होण्याची चिन्हे आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here