प्रजासत्ताक दिनानिमित्त महा आरोग्य शिबिर संपन्न!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

प्रजासत्ताक दिनानिमित्त महा आरोग्य शिबिर संपन्न!

मंगळवेढ्यातील सुप्रसिद्ध डॉ.रविंद्र नाईकवाडी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त महा आरोग्य शिबिरा मध्ये 24,25,26 जानेवारी 2023 रोजी जवळपास एक हजारहून अधिक दुर्बल घटकातील रुग्णांची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.

यामध्ये सवलतीच्या दरामध्ये ईसीजी एक्स-रे रक्त तपासणी ,शुगर तपासणी मोफत करण्यात आली व खऱ्या अर्थाने गरजू लोकांना या आरोग्य शिबिराचा लाभ झाला तसेच आजी-माजी सैनिक व त्यांचा परिवारा तील व्यक्तींना सुद्धा मोफत तपासणी करण्यात आली.

तसेच पोलीस कर्मचारी यांची सुद्धा मोफत आरोग्य तपासणी केली आहे. पर्यंत डॉ.रवींद्र बाळासाहेब नाईकवाडी यांनी गरजू रुग्णांना वेळोवेळी मोफत व अत्यल्प दरामध्ये उपचार पद्धती सुरू ठेवून मंगळवेढेकरांचे व तालुक्यातील बऱ्याचशा गरजू लोकांना स्वतःच्या प्रयत्नाने व कष्टाने अखंडित सामाजिक कार्य सुरू ठेवले व पुढे ही असेच सुरू राहील असे भाषणात बोलताना सांगितले.

यावेळी मा.गौरीशंकर गुरुकुल भाजप शहराध्यक्ष, मा. प्रतिक किल्लेदार बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुख, मा. संभाजीराव घुले, सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष मंगळवेढा मा. प्रशांत यादव, नगरसेवक मंगळवेढा ग्रामपंचायत सदस्य अमित गवळी ,उद्योजक दिग्विजय सिंग राजपूत यांनी व्यक्त केले व पुढील वाटचालीस हॉस्पिटल ला शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here