प्रचारात दिलेला शब्द खरा केला! (अवघ्या दीड महिन्यामध्ये तीन लाख मे.टन ऊसाचे गाळप करून साखर कारखानदारांपुढे ठेवला नवा आदर्श)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व पंढरपूर मंगळवेढा व माढा तालुक्याच्या मध्यभागी असणारा वेणुनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना,पंढरपूरचे धाडसी युवा उद्योजक, विठ्ठल परिवाराचे नेते, उद्योगपती धाराशिवचे युनिट पाच व्यवस्थितपणे चालवणारे मा. अभिजीत (आबा) पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यापासून सहा महिन्यांमध्ये अक्षरशा जीव तोडून काम सुरू केले. पंढरपूरच नव्हे तर पंढरपूर ग्रामीण भागातील लोकांची एक घट्ट नाळ निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या नव्याने सुरू केलेल्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सह साखर कारखान्याच्या नव्या व जुन्या मिलचा मीलाभ घालत अवघ्या 45 दिवसांमध्ये ३लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. पंढरपूर तालुक्यातील व आसपासच्या भागातील गावातील सर्व गोरगरीब समाजात शेतकऱ्यांना ऊसाला चांगला भाव मिळण्यासाठी प्रयत्न करत असतात.

एकीकडे जिल्ह्यामध्ये ऊसाची पहिली उचल किती द्यायची ही स्पर्धा सुरू असताना अभिजीत पाटील यांनी 23 रुपये पहिली उचल जाहीर करून जवळजवळ पंढरपूर व आसपासच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. खोडवा किंवा लागण 860 32, किंवा 265 या जातीच्या वाहनाचा ऊस कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता फक्त आणि फक्त पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिले असून कारण हा कारखाना पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व सभासदांच्या मालकीचा आहे हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून युवा उद्योजक उद्योगपती अभिजीत पाटील यांनी उद्दिष्ट सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांच्याशी बातचीत केली असता ही सगळी कामगिरीही कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग कारखान्याचे कामगार व सर्व सभासद शेतकरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे मत यावेळेस डीव्हीपी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पंढरपूरचे अभिजीत (आबा) पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here