पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती!

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आलं होतं.

मात्र, राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सरकारला फटकारलं होतं. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे.

विद्यमान पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी होती. संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल २०२१ पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, पांडे यांना या पदावरून हटविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे ॲड. दत्ता माने यांनी केली होती. पोलिस महासंचालक हे पद सर्वोच्च असून त्याच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया असते. यानुसार राज्यातील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून अंतिम नावांची शिफारस महासंचालक पदासाठी केली जाते. त्यातून पूर्णवेळ महासंचालक नियुक्ती केली जाते.

ही प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. यातील अंतिम तीन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हेमंत नागराळे, के. व्यंकटेशम आणि रजनीश सेठ यांचा समावेश आहे, असे याचिकेत स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता यातून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here