पोलीस आयुक्तालय परिसरात कलम 37 (1), 37 (3) लागू

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पोलीस आयुक्तालय परिसरात कलम 37 (1), 37 (3) लागू

सोलापूर, दि.16 : सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी दिनांक 16 सप्टेंबर 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

            या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडे असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, असभ्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरणे सभ्यता अगर नितीविरूध्द निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील व त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होवून अशी सोंगे अगर चिन्ह अगर दस्तऐवज अगर जिन्नस तयार करून त्याचा प्रचारासाठी उपयोग करणे यास मनाई करण्यात आली आहे.

            या आदेशानुसार मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास, 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदन, धरणे, सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी असेल त्यांना लागू राहणार नाही.

            सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here