पैशासाठी मेलेल्या मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा “खोंद्रे” कोण!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून एका प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना धरत होता वेठीस.

पैशासाठी आजकाल कोणीही कोणत्याही थराला जात असल्याचे आपल्या आसपास पहावयास मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अशाच ‘खोंद्रे’ नामक एका पठ्ठ्याने तर उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात खोटा मजकूर सादर करत माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना “तुम्ही काय न्यायाधीश आहात काय?” अशा प्रकारे अवार्त्य भाषा वापरत सुनावण्याचा प्रयत्न केला.पण माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत संबंधित प्रकरणात मयत शिक्षकाच्या निराधार पत्नीस न्याय मिळवून दिला .

वेतवडे ता. पन्हाळा येथील शिवपार्वती शिक्षण प्रसारक मंडळ वेतवडे संचलित स्वातंत्र्यसेनानी एम.डी नाझरे माध्यमिक विद्यालय वेतवडे येथील हा प्रकार असून या शाळेत किसन बाळासो गुरवळ यांना १३/१०/२००८ रोजी पासून संस्थेने सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त केले होते त्यानंतर सदर संस्थेच्या मालकीहक्का वरून आनंदा देमजी चौगले व नरेंद्र नामदेव मुळीक यांच्यात संस्था मालकीवरून न्यायालयीन वाद सुरू होता. दरम्यानच्या कालावधीत तो वाद काही अंशी मिटल्याने सध्या सचिव आनंदा देमजी चौगले व कार्याध्यक्ष संजय माने हे संस्था चालवत आहेत.पण किसन गुरवळ या शिक्षकांच्या विरोधात नरेंद्र मुळीक व संबंधित दुसरे शिक्षक यांचा न्यायालयीन विरोध सुरूच होता. त्यानंतर किसन गुरवळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार श्री गुरवळ यांना १३/१०/२००८ ते १६/४/२०१७ या कालावधीच्या मान्यते संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल झाला. त्यानंतर श्री गुरवळ यांचे दि ६ ऑगस्ट २०२० रोजी आकस्मिक निधन झाले व सदर शाळेमध्ये रिक्त जागेवर श्री सुरेश पाटील व श्री गुरवळ यांच्या वारसाबद्दल संस्था व मुख्याध्यापक यांच्यामध्ये ३फेब्रुवारी २०२१ रोजी समझोता मसुदा झाला. त्यानुसार उच्च न्यायालयाने अंतिम निकाल देत मागील याचिका निकाली काढल्या गेल्या आणि सुरेश पाटील यांना ५/३/२०२१ रोजी खात्याने मान्यता दिली व श्री गुरवळ यांना २००८ ते २०१७ या कालावधीची मान्यता दिल्याने त्यांच्या निराधार पत्नीस न्याय मिळाला परंतु ” खोंद्रे “नामक एका व्यक्तीच्या मयत गुरवळ यांच्या विरोधातील २७ जानेवारी २०२२ रोजी आलेल्या अर्जाचा माध्यमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांनी व संस्थेने विचार न करता मला पूर्णपणे न्याय मिळवून दिल्याचे श्री गुळवळ यांच्या पत्नींनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी एका निराधार शिक्षक पत्नीस दिला न्याय! सर्वत्र कौतुक

शिवपार्वती शिक्षण संस्था वेतवडे ता. पन्हाळा येथील शिक्षण संस्थेत २००८ ते २०१७ या कालावधीत रुजू असणारे व २०२० मध्ये निधन झालेल्या एका शिक्षकाला न्यायालयीन आदेशाच्या अनुशंगाने सदर कालावधीची मान्यता देत तसेच पैशासाठी उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात चोच मारणाऱ्या ” खोंद्रे ” नामक व्यक्तीच्या कोणत्याही दबावाखाली न येता निपक्षपणे सदर प्रकरणाचा निकाल देत त्या शिक्षक पत्नीस न्याय मिळवून दिल्याने कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

“खोंद्रे “सारख्या व्यक्तींचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे! शिक्षकपत्नीची मागणी.

एखाद्या प्रकरणाची पूर्णपणे माहिती नसतानाही त्या प्रकरणात फक्त पैशाच्या हव्यासापोटी एखादा अर्ज दाखल करून लोकांना वेठीस धरत त्यांना आडकाठी आणणाऱ्या जिल्ह्यातील खोंद्रे सारख्या व्यक्तींकडून समाजाला धोका आहे. अशा बिनकामी इसमांचा प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here