पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी तर कार्याध्यक्ष पदी शहनाज कंपली यांची निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पूर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी तर कार्याध्यक्ष पदी शहनाज कंपली यांची निवड

सोलापूर // प्रतिनिधी 

पुर्व विभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाच्या नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण दासरी तर कार्याध्यक्षपदी शहनाज कंपली यांची निवड करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दिली.
पुर्व विभाग नवरात्र महोत्सव महामंडळाच्या विश्वस्त मंडळाचे बैठक दि. ०६/१०/२०२१ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती महामंडळाच्या कुचननगर (पद्मशाली चौक) येथील कार्यालयात घेण्यात आली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) हे होते. सदर बैठकीत सन २०२१ च्या नवरात्र उत्सव समितीचे खालीलप्रमाणे पदाधिकारी निवड करण्यात आली. अध्यक्ष :- लक्ष्मीनारायण दासरी, कार्याध्यक्ष :- शहनाज कंपली, उपाध्यक्ष :- रवि गेंट्याल, गुरुनाथ कोळी, सरचिटणीस :- सतीश चिटमिल, खजिनदार :- विठ्ठल कुऱ्हाडकर, कार्यालय प्रमुख :- गणेश म्हंता, प्रसिध्दीप्रमुख :- प्रसाद जगताप, श्रीनिवास बोगा, कायदेशीर सल्लागार :- ॲड. मुनिनाथ कारमपुरी यांची निवड करण्यात आली. सर्व निवडी विश्वस्त मंडळ सदस्य यांच्या एकमताने करण्यात आला.
सदर बैठकीस विष्णु कारमपुरी (महाराज), श्रीनिवास चिलवेरी, दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, नागनाथ कारमपुरी, लक्ष्मीनारायण दासरी, श्रीनिवास बोगा, प्रसाद जगताप, गुरूनाथ कोळी, गणेश म्हंता, ॲड. मुनिनाथ कारमपुरी, रमेश चिलवेरी आदि उपस्थित होते. यावेळी महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांनी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here