पुळूज शाळेत व्हर्च्युअल नागपंचमी साजरी.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पुळूज शाळेत व्हर्च्युअल नागपंचमी साजरी.

 

कोव्हिड 19 चा कहर संपूर्ण जगात झाला आणि शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले. यावर उपाय म्हणून राज्यभरातील शिक्षक तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाईन शिक्षण व मार्गदर्शन करू लागले. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज, ता पंढरपूर या शाळेत व्हर्च्युअल नागपंचमी साजरी करण्यात आली. शाळेतील मुले व मुली आज नागपंचमी म्हणून नटून थटून ऑनलाईन हजर झाली होती. शिक्षकांपेक्षा मुलींचा उत्साह कमालीचा होता. ऑनलाईन तास संपल्यानंतर शिक्षक सचिन निरगिडे सर यांनी नागपंचमीचे महत्त्व सांगितले व गोष्ट सांगितली. नाग व साप हे शेतक-याचे मित्र कसे आहेत? आज नागाची पूजा का व कशी करायची? ही सर्व माहिती सांगितली. तसेच सापाला घाबरायचे नाही तर न घाबरता सर्पमित्राला बोलवावे. याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर आपापल्या घरी विद्यार्थ्यांनी फुगडी व झोके हे नागपंचमी स्पेशल खेळ खेळले. बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिण-बहिण, व बाप-लेक असे विविध नात्यांची व मित्रमैत्रिणी यांच्या फुगड्या ऑनलाईन गुगल मीट वर मनसोक्त घुमल्या. व ‘उंच माझा झोका गं’ म्हणत झोके व पिंगा गगनाला भिडला नसला तरी गगनाएवढा आनंद देऊन गेला. निरगिडे गुरुजींनी सुद्धा मुलाबरोबर फुगडी धरली. आपल्या पाल्यांचे कौतुक ऑनलाईन पाहत पालकांनी सुद्धा या नवीन उपक्रमाला दाद दिली व कौतुक केले. शेवटी सरांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व व्हर्च्युअल (ऑनलाईन) नागपंचमी हा कार्यक्रम संपन्न झाला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here