पुळुज ग्रामस्थांच्या वतीने सतीश अण्णा जगताप यांचा सत्कार संपन्न! (राहिलेल्या सर्व विकास कामांना इथून पुढे प्राधान्य देणार:- सतीश अण्णा जगताप)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मोहोळ तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या एकमेव अशा सोहळे ग्रामपंचायतीवर भीमा परिवाराचा झेंडा फडकविल्यानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश अण्णा जगताप यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे! आज भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक साहेब यांचे मुख्य गाव असलेल्या पुळुज येथील सर्व ग्रामस्थांनी, कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश अण्णा जगताप यांच्या सोहळा येथील फार्म हाऊस वर जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केला!
व पुढील सर्व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या!
यावेळी कारखान्याची उपाध्यक्ष सतीश अण्णा जगताप यांनी सुद्धा सर्वांचे यावेळी आभार मानले!
यावेळी विनोद भैय्या महाडिकसाहेब, पुळुजचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम बाबर, सरपंच लक्ष्मण पांढरे, समाजसेवक सदाशिव आण्णा म्हमाने, भीमा परिवाराचे जेष्ठ नेते भारत पाटील, भैया बाबर, पिनू सर भोसले, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत व्होनकळस , उमेश वेदपाठक, सोनू भोसले विश्वासराव पांढरे, त्याचप्रमाणे पुरुष गावातील सर्व जेष्ठ कनिष्ठ कारखान्याचे सर्व सभासद व भीमा परिवाराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here