पुलावरील पडलेल्या खड्याबाबत महर्षी वाल्मिकी संघाकडून शासनाचा जाहीर निषेध!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गुढीपाडव्याचे औचित्य साधत खड्यात उभारली गुढी! 

पंढरपूर प्रतिनिधी- पंढरीतील ऐतिहासिक असलेल्या जुन्या दगडी पुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्यांबाबत गुढीपाडव्याचे औचित्य साधत खड्यात गुढी उभारून महर्षी वाल्मिकी संघाकडून शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 

अनेक दिवसांपासून या जुन्या दगडी पुलावरील रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्याबाबत महर्षी वाल्मिकी संघाकडून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. पण प्रशासनाकडून मात्र दखल घेतली गेली नाही असे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी सांगितले आहे.

गुढी पाडवा हा वर्षातील सर्वात मोठा सण हिंदू नव वर्षाची सुरुवात गुढी पाडव्याच्या दिवसांपासून सुरू होते म्हणूनच आज आम्ही पाडव्याच्या दिवशी या झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी गुढी ही रस्त्यावर पडलेल्या खड्यात उभी करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि हा रस्ता दुरूस्ती करून नवीन करण्यात यावा यासाठी हे आंदोलन केले असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. 

याप्रसंगी संपत सर्जे, सोमनाथ नाथराव, निलेश माने, अण्णा आडगाव, नवनाथ शिंदे, सिद्धेश्वर कोळी, प्रल्हाद करकमकर सुहास कोरे भैया अंभगराव सोनू मानेव महर्षी वाल्मिकी संघाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here