पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर! (श्री संत दामाजी महाविद्यालय कडे यावर्षी यजमानपद)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 17 ऑक्टोबर पासून या स्पर्धांना प्रारंभ होत आहे.

यावर्षी मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी महाविद्यालयाकडे या स्पर्धेचे यजमानपद आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात या स्पर्धा झाल्या नव्हत्या. यंदा उत्साहाने स्पर्धा होतील, अशी अपेक्षा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.जे .एम. सरवदे यांनी व्यक्त केले.
स्पर्धेची वेळापत्रक: हॉलीबॉल: शिक्षण शिक्षण शास्त्र महाविद्यालय, बार्शी (17 व 18 ऑक्टोबर), कबड्डी: शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते (19 व 20 ऑक्टोंबर), खो-खो: दामाजी विद्यालय, मंगळवेढा (21 व 22 ऑक्टोंबर), बास्केटबॉल: ग्रीन फिंगर्स, अकलूज (27 व 28 ऑक्टोबर), बुद्धिबळ: लोकमंगल विद्यालय, वडाळा (2 ते 4 नोव्हेंबर), अॅथलेटिक्स: शिक्षण शास्त्र महाविद्यालय, बार्शी (7 ते 9 नोव्हेंबर), जलतरण: संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर (11 ते 12 नोव्हेंबर), कुस्ती: के. एन. भिसे महाविद्यालय, कुरूडवाडी (12 ते 14 नोव्हेंबर), क्रॉस कंट्री: दयानंद महाविद्यालय, सोलापूर (14 नोव्हेंबर), लॉन टेनिस: डीएव्ही वेलणकर महाविद्यालय, सोलापूर (16 नोव्हेंबर), धनुर्विद्या: लता गांधी महाविद्यालय, वैराग (17 नोव्हेंबर), ज्युदो: बाबुराव पाटील विद्यालय, अनगर (17 ते 19 नोव्हेंबर), तायक्वाॅदो: विज्ञान महाविद्यालय, सांगोला (21 व 22 नोव्हेंबर), बॉक्सिंग: के. एन. भिसे महाविद्यालय, कुरूडवाडी (23 व 24 नोव्हेंबर), टेबल टेनिस शिक्षण शास्त्र: विद्यालय बार्शी (25 व 26 नोव्हेंबर), हॅडबॉल: शिवाजी रात्र महाविद्यालय, सोलापूर (12 व 13 डिसेंबर), तलवारबाजी: माऊली महाविद्यालय, वडाळा (14 डिसेंबर), बॅडमिंटन: सी.बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट (16 व 17 डिसेंबर), रायफल शूटिंग: शिवाजी रात्र महाविद्यालय, सोलापूर (19 व 20 डिसेंबर), योग: शिवाजी विद्यालय, बार्शी (21 डिसेंबर), जिम्नॅस्टिक व मल्लखांब: शिवाजी महाविद्यालय, बार्शी (22 डिसेंबर), फुटबॉल: हि. ने. महाविद्यालय (23 ते 25 डिसेंबर), सॉफ्टबॉल: सुशीलकुमार शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर (26 व 27 ), हॉकी: सोशल महाविद्यालय, सोलापूर (28 व 29 डिसेंबर), पावर लिफ्टिंग,वेट लिफ्टिंग: शंकरराव मोहिते विद्यालय, अकलूज (3 व 4 जानेवारी 2023), बेसबॉल: देशभक्त गरड विद्यालय, मोहोळ (10 व 11 जानेवारी), क्रिकेट: वाय सी एम करमाळा, शूटिंग हॉलीबॉल: पी एम पी एम विद्यालय, मोहोळ, गटका: महाडिक महाविद्यालय, मोडनिंब,
या स्पर्धेसाठी श्री संत दामाजी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. एन. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झोनल सेक्रेटरी प्रा. विजय दत्तू, प्रा. गणेश जोरवर हे परिश्रम घेत आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here