पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या जाव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  

????????????????????????????????????
satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पालखी महामार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात राज्य शासन कमतरता राहू देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

* केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून वाखरी ते पंढरपूर महामार्ग करण्याचा खूप महत्त्वाचा निर्णय
   राज्य शासन रस्ते निर्मितीसाठी केंद्रासोबत सोबत राहील
*  पालखी महामार्गामुळे या भागाचा विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशी चांगला  
   संपर्क राहणार
*  पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवला जाणार
*  पंढरपूर ची दिंडी ही जगातील सर्वात प्राचीन यात्रा आहे
*  पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सावली देणारे वृक्ष, शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या   
    सोयी व पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र करण्याचे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले
    केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग    
    महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 महामार्ग  प्रकल्पाचे भूमिपूजन व  
    लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले
*  या 574 किलोमीटरच्या महामार्गासाठी 12 हजार 294 कोटीची तरतूद
           सोलापूर/पंढरपूर, दि.8 (जिमाका):- संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाचे लांबी अनुक्रमे 231 व  130 किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण 12 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तरी या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
                    पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 13 विविध महामार्ग प्रकल्पाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले; त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचे सचिव गंगाधर अरमाने, राज्याचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडवणीस, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
              
                    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, या पालखी महामार्गामुळे या भागातील विकासाला गती मिळण्याबरोबरच दक्षिण भारताशी ही चांगला संपर्क निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग बनवले जाणार असून या मार्गावर वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या जाव्यात. पंढरपूरची वारी जगातील सर्वात प्राचीन वारी असून या ठिकाणी भरणारी यात्रा ही सर्वात मोठी यात्रा आहे. शेकडो वर्षाची गुलामी, नैसर्गिक आपत्तीमध्ये ही वारी सुरूच असून या वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव व द्वेष केला जात नसून ही जगाला समानतेचा संदेश देणारी वारी असून या ठिकाणी प्रत्येक वारकरी हा समान असतो असे त्यांनी सांगितले.
               केंद्र शासनाकडून देशभरात मोठ्या प्रमाणावर महामार्गाची निर्मिती केली जात असून प्रत्येक गाव व खेडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरीला ही पालखी महामार्गाने जोडले जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे. या रस्त्यामुळे सांस्कृतिक प्रगतीबरोबरच या भागाच्या विकासाला अधिक चालना मिळून येथे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले जाऊन रोजगार निर्मितीही होणार असल्याने हे मार्ग म्हणजे विकासाचा नवा प्रवाह असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करून पंढरीची वारी ही स्त्री पुरुष समानतेचे प्रतिक असल्याचेही त्यांनी म्हटले.
                यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी या भागातील नागरिकांकडून पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सावली देणारे वृक्ष लावणे, पालखी मार्गावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे व भविष्यात पंढरपूर हे भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच येथील जनसमुदायाशी काही वेळा मराठी भाषेतून ही त्यांनी संवाद साधला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here