पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली नवीन महसूल भवन इमारतीची पाहणी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूरदि.१८ (जि. मा. का.) : येथील नियोजन भवन शेजारी  बांधण्यात आलेल्या नवीन महसूल भवनची पाहणी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली.

            यावेळी त्यांच्या समवेत  ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुखआमदार सचिन कल्याणशेट्टीजिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीजिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडेपोलीस आयुक्त राजेंद्र मानेसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक संजय माळीनिवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह महसूल विभागसार्वजनिक बांधकाम विभागसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

             नवीन महसूल इमारत अत्याधुनिक व सर्व सोई सुविधानी युक्त असूनजिल्हाधिकारी कार्यालयासह अधिनस्त प्रमुख कार्यालये या नवीन महसूल भवनात लवकरच सुरू होणार आहेत. या नूतन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असूनफर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

            यावेळी महसूल भवनातील सर्व दालनांचीअधिनस्त कार्यालयांची पालकमंत्री विखे पाटील यांनी पाहणी केली. यामध्ये जिल्हाधिकाऱी कार्यालयपार्किंग व्यवस्थाकर्मचारी बैठक व्यवस्थापाणी व्यवस्थाबैठक सभागृह आदि ठिकाणची पाहणी केली.

            तसेच या नवीन महसूल भवनांमध्ये उपलब्ध सुविधा तसेच येणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी आवश्यक सूचना दिल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here