पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा दि. 18 नोव्हेंबर रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा शुक्रवार, दि, 18 नोव्हेंबर 2022 रोजीचा सोलापूर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –

सकाळी 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून मौजे कुंभारी येथे आगमन व रे. नगर फेडरेशन मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या 30 हजार सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेची पाहणी व आढावा बैठकीस उपस्थिती. 11.00 वा. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकास कामाबाबत विभाग प्रमुखांची आढावा बैठक. दुपारी 12.00 वा. प्रधानमंत्री ग्रामसडक व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा. दुपारी 12.30 वा. लम्पी आजाराबाबत आढावा. दुपारी 1 त 1.30 वा. राखीव. दुपारी 1.30 वा. पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी 1.45 वाजता नूतन जिल्हाधिकारी (महसूल भवन) इमारत पाहणी, दुपारी 2.00 वा. सुरत चेन्नई हायवेच्या व शहरातील फ्लायओवरच्या भुसंपादनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. 3.00 वा. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व नागरिकांसाठी भेटीसाठी वेळ राखीव. सायंकाळी 4.15 वा. इंदिरा गांधी क्रीडा संकुल उद्घाटन व महापौर चषक स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वा. पाथरी येथे आगमन व प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here