पाटकुल येथे उजनीच्या फुटलेल्या कॅनल चे दुरुस्तीचे काम कासव गतीने! (हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास स्वाभिमानी तीव्र आंदोलन उभे करणार:-सचिन पाटील)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मागील पंधरा दिवसांपूर्वी उजनीचा कॅनल फुटून शेकडो एकर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले परंतु कॅनल फुटून पंधरा दिवस झाले तरी पाटबंधारे विभागाने मात्र मरगळ झटकलेली दिसत नाही पाटबंधारे विभागाच्या मेकॅनिकल युनिटचे काम कासव गतीने सुरू आहे. हे काम असंच सुरू राहिलं तर पुढील एक महिनाभर तरी शेतकऱ्याला पाणी मिळणे अशक्य आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर कॅनल फुट झाल्यामुळे कॅनलच्या कार्यक्षेत्रात असणारी पिके आता सुकू लागली आहेत त्यामुळे उजनी पाटबंधारे विभागाने तात्काळ खाजगी यंत्रणा घेऊन रात्रंदिवस हे काम चालू ठेवून कॅनल दुरुस्त करून घ्यावा.
उजनी कॅनल वर फेरफटका मारल्यानंतर असं लक्षात येते अनेक वर्षापासून या कॅनलचे दुरुस्ती असेल झाडेझुडपे काढणे असेल काँक्रिटीकरण ची दुरुस्ती असेल याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे त्यामुळे ही घटना घडली याआधी या कालवा दुरुस्तीचे किती टेंडर निघाले आहेत त्यावर किती पैसे खर्च झाले आहेत याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे कारण आज पर्यंतचा मेंटेनन्स हा कागदावर झालेला दिसतोय प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कॅनॉलची दुरावस्था झाली आहे
आता जरी एक ठिकाणी कॅनल फुटला असेल परंतु आत्ताही अनेक ठिकाणी कधी कुठे कॅनल फुटू शकतो अशी अवस्था या उजनी कॅनॉल ची असून याकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डोळे झाक करत आहेत मागील काही दिवसापूर्वी उजनी कॅनॉलच्या दुरुस्तीचे आणि झाड झुडपं काढण्याचे तीस ते चाळीस कोटीचे टेंडर झाले होते परंतु त्यामध्ये कुठेही काम दिसत नाही प्रत्यक्षात पाण्याची पाळी सुटण्याआधी ही सर्व दुरुस्तीचे कामे होऊन कॅनलच्या साईट पट्टीवरील झाडे जोडपे काढून रस्ते दुरुस्ती होणे गरजेचे होतं परंतु ते झालेलं दिसत नाही की उजनी विभागाचे अधिकारी आणि टेंडर ठेकेदाराने संगणमत करून कागदावरच कॅनलची देखभाल दुरुस्ती केली का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
उजनी कॅनॉल ला पुढील शेतकऱ्यांना तात्काळ पाणी द्यायचे असेल तर ज्या ठिकाणी कॅनल फुटला आहे त्याच्या पाठीमागील गेट डाऊन करून तिथून वरील कॅनलचे भरणे पाणी देऊन काढले पाहिजे म्हणजे दुरुस्ती झाल्या झाल्या कॅनल फुटल्याच्या पुढील शेतकऱ्यांना तात्काळ पाणी मिळेल जर हे काम पुढील आठ ते दहा दिवसात पूर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल होणाऱ्या नुकसानीस कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जबाबदार असेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here