पांडुरंग व लोकनेतेची बिनविरोध मुळेच प्रगती!भीमा मात्र कायम राजकारणाचा अड्डा कशासाठी? प्रा.संग्राम चव्हाण

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कै.भीमरावदादा महाडिक यांच्याकडून भीमाची आपल्या परिसरात स्थापना हे अत्यंत शुभ-लाभ कारक व प्रगतीचे पाऊल होतं.परंतु स्थापनेपासूनच भीमा गलिच्छ राज कारणाच्या साठमारीच्या
च्या खेळात अडकलेला दिसतो. भीमा कारखान्यातून प्रेरणा घेऊनच पांडुरंग व लोकनेते या दोन मोठ्या कारखान्यांचा जन्म झाला आहे.हे दोन्ही कारखाने सुरुवातीपासून राजकारण विरहित ठेवण्यात नेतृत्व व सभासद यांना यश आले.बिनविरोध निवडणुकांमुळे या दोन्ही कारखान्यांनी केलेली नेत्रदीपक प्रगती सर्वांच्या डोळ्यासमोर आहे.या पार्श्वभूमीवर भीमा कारखाना मात्र राजकारणाचा ‘अड्डा’ बनलेला दिसतो. बचाव समितीच्या वर्तनावरून ‘कुणीही यावे आणि टिकली मारून जावे’ असेच चित्र असल्याचे स्पष्ट होते.भीमा कारखाना हजारो कुटुंबांची चूल आहे मग या भीमा वरच हा राजकीय साठमारीच्या खेळ कशासाठी?भीमाला राजकारणाचा अड्डा बनवायचे काय कारण? “तू का मी?” या खेळात भीमाचे एक्सपान्शन व कोजनरेशन हे दोन्ही प्रकल्प दहा वर्षे रखडलेले सर्वांनी ऊघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे.त्याची मोठी किंमत सभासदांना मोजावी लागली.
भीमाच्या सभासदांची ऊसाची विल्हेवाट लावताना स्वतःचा कारखाना असूनसुद्धा ससेहोलपट झाली. पांडुरंग व लोकनेते कारखान्यां वरील परिचारक व पाटील यांच्या एक हाती
सत्तेमुळेच या कारखान्यांची प्रगती झाली आहे.भीमावर सुद्धा महाडिकांची एक हाती सत्ता कायम ठेवणं गरजेचे आहे. महाडिक यांनी सत्ता आल्यानंतर एक्सपान्शन व कोजनरेशन हे दोन्ही प्रकल्प उभे करून दाखवले व सुमारे 17 कोटी रुपयांची वीज निर्मिती करून दाखवली तर या आगामी काळात ते मोठ्या क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पही पूर्ण करत आहेत.श्री. महाडिक यांच्याकडे एकहाती सत्ता सोपवल्या नंतरच संस्थेचा विकास झाला.महाडिकच भीमाची खर्‍या आस्थेने प्रगती साधू शकतात हे आता भीमाच्या सभासदां च्या लक्षात आले असून यापुढेही भीमाची सत्ता भीमाचे सभासद खा.धनंजय महाडिक यांच्याकडेच सोपवतील असा मला विश्वास वाटतो! असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन भीमा परिवाराचे संघटक समन्वयक, टाकळी सिकंदर चे युवानेता तथा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी आज येथे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here