पवित्र रमजान ईद म्हणजे धार्मिक समतेचा व्यापक संदेश – आ. समाधान आवताडे 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
पवित्र रमजान ईद म्हणजे धार्मिक समतेचा व्यापक संदेश देणारा सण असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले. समाजकारण आणि राजकारण या सेवाभावी कार्य पटलावर जात,धर्म,पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्वधर्म समभाव ही संकल्पना आत्मसात करणारे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान दादा आवताडे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर व मंगळवेढा तालुका आणि शहरातील मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्त असणारे रोजा सोडण्यासाठी मंगळवेढा येथील जनसंपर्क कार्यालय आवारामध्ये युवक नेते तथा कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे मित्रमंडळ यांच्यावतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले. त्यावेळी उपस्थित बांधवाना शुभेच्छा देताना आ. समाधान आवताडे यांनी वरील गौरोउदगार काढले.
रमजान हा मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना. गेल्या अनेक दशकांपासून मंगळवेढा तालुक्यातील हिंदु – मुस्लिम बांधव समतेचा संदेश देत विविधतेत एकता निर्माण करणारा हा सण अगदी बंधु – भावाप्रमाणे साजरा करीत असतात. रमजान महिन्यात अल्लाह च्या भक्ती साधनेपूरक आराधनेच्या अनुषंगाने दिवसभर रोजा केला जातो. बंधूभाव आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले. हेच या देशातील आणि मतदारसंघातील एकात्मतचे चित्र आहे. असे सांगून आमदार महोदय यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदर इफ्तार पार्टीस दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे, प्रा. येताळा भगत, प्रा. दत्तात्रय जमदाडे, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजभाई काझी, राजेंद्र सुरवसे, माजी उपनगराध्यक्ष मा. चंद्रकांत पडवळे, माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, उद्योजक आझादभाई पटेल, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, न. पा. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, फिरोज मुलाणी, डी. सी. जाधव, शकील काझी, सिद्धेश्वर दत्तु, अशोक लेंडवे, खंडू खंदारे, सत्यजित सुरवसे, अविनाश मोरे, बालम मुलाणी,दादासाहेब डोंगरे, जनार्धन कोंडुभैरी, संग्राम पाटील, बबलु सुतार, विजय बुरकूल, बाबा कोंडुभैरी, जहाँगीर दरवाजकर आदी मान्यवर हिंदु – मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here