परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूरात भव्य मिरवणूका

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

(मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे यांनी केले सर्व मंडळाचे स्वागत)

विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 19 एप्रिल रोजी पंढरपूर शहरात सर्व मंडळानी भव्य मिरवणुका काढल्या होत्या.
शहरातील स्टेशन रोड येथील गोल्डन टी चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत कक्ष उभा करण्यात आला होता.
या ठिकाणी सर्वच मंडळाचे स्वागत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केले .
यावेळी कोळी महासंघाचे उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी, मनसे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष ज यवंत भोसले ,तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील ,शहराध्यक्ष संतोष कवडे, विरोधी पक्ष नेते सुधीर धोत्रे, नगरसेवक संजय बंदपट्टे, मी वडार महाराष्ट्राचा जिल्हाध्यक्ष दत्ता भोसले ,नगरसेवक महादेव धोत्रे ,नगरसेवक लखन चौगुले ,पत्रकार अभिराज उबाळे ,पिंटू बाबा पवार ,मनसे उपाअध्यक्ष महेश पवार, विकी चव्हाण, सचिन सुतार, सुरज देवकर, अनिल बागल, अभिषेक सर्वगोड, अमोल आटकळे, शुभम काकडे , तेजस गांजळे इत्यादी उपस्थित होते .
यावेळी मनसेच्या वतीने मिरवणूक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्यास रुपये पंचवीस हजार ,द्वितीय येणाऱ्यास रुपये 15000, तृतीय येणाऱ्यास रुपये 11000 आणि सन्मानचिन्ह तसेच ज्या मंडळांनी मिरवणुकीत भाग घेतला त्या प्रत्येक मंडळाला उत्तेजनार्थ म्हणून पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे..
सर्वच मंडळांनी सुंदर देखाव्यासह प्रचंड उत्साहात मिरवणूक काढल्या होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here