पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूरात बैठक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूरात बैठक

सोलापूर // प्रतिनिधी 

पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी ( बी एस ) होते
या बैठकित
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
पत्रकारांसाठी विमा व घरकुल योजना
यादीवर नसलेल्या वृतपत्र ना शासकीय जाहिराती मिळणे
कोरोनामुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला शासकीय मदत
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी
राज्यातील युट्युब ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे या सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली
व्यापक आंदोलन शिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत यशवंत पवार
गेली अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने वारंवार आंदोलन उपोषण निवेदन सुरु असून राज्य सरकार ला जाग आणण्यासाठी व पत्रकारांचे प्रश्न सुटण्यासाठी व्यापक आंदोलन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी केले आहे
या बैठकीला प्रदेश शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार सचिव अभिषेक चिलका अक्षय बबलाद इस्माईल शेख प्रदीप पेदापल्लीवार राम हुंडारे विजय चव्हाण संतोष खलाटे नागनाथ गणपा श्रीकांत कोळी सतीश गडकरी प्रदीप पेदापल्लीवार इत्यादी पत्रकार उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here