पत्रकार शाहबाज दिवकर हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्रीकडे तक्रार

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकार शाहबाज दिवकर हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्रीकडे तक्रार

 

सोलापूर // प्रतिनिधी

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार शाहबाज दिवकर यांच्यावर डोक्यात बाटली फोडून व शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून प्राणघातक हल्ला केला असून या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून पत्रकार शाहबाज दिवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आज्ञात गुंडाना तात्काळ अटक करून कडक कारवाई करणे बाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे
प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारवर हल्ला बोल
महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण च्या प्रकरणात मोठी वाढ झाली असून बातमी लावण्यावरून प्राणघातक हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा जळजळीत सवाल राज्य सरकार ला विचारला असून मूठभर पत्रकारांना खूष ठेवून शेकडो प्रामाणिक पत्रकारांना राज्य सरकार ने वाऱ्यावर सोडल्याची बोचरी टीका यशवंत पवार यांनी यावेळी केली असून राज्य सरकार पत्रकारांच्या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे
पत्रकार सुरक्षा समिती ने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राज्यसरकार ला दिला आहे
या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) अक्षय बबलाद इस्माईल शेख रोहित घोडके गिरीश गोसकी विवेकानंद खेत्री संतोष खलाटे प्रदीप पेदापल्लीवार श्रीनिवास वंगा हरी भिसे, दत्तात्रय धनके अतुल भडंगे, नागनाथ गणपा श्रीकांत भल्ला इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here