पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी सर्व पत्रकारांनी संघटीत व्हावे :- विष्णु कारमपुरी (महाराज)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी सर्व पत्रकारांनी संघटीत व्हावे :- विष्णु कारमपुरी (महाराज)

 

सोलापूर // प्रतिनिधी 

प्रसिध्दी माध्यमात काम करणाऱ्या पत्रकार व पत्रकारितेर कर्मचारी यांचे समस्या ह्या दिवसेंदिवस जटिल होत चालले आहेत . त्यामुळे आपले समस्या सोडवुन घेण्यासाठी सर्व पत्रकारांनी संघटीत होऊन संघर्ष करावे . असे आव्हान सोलापुर वृत्तपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाच्या बैठकीत उपस्थित पत्रकारांना केले .
सोलापूर वृत्तपत्र पत्रकार संघाची बैठक संघटनेच्या कार्यालयात संपन्न झाली . त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विष्णु कारमपुरी (महाराज) हे होते . सदर बैठकीत मागील सभेचे वृत्तांत करणे, संघटनेच्या सदस्यांची समस्या सोडविण्याबाबत आणि पत्रकार संरक्षण कायदा आमलात आणण्यास दिरंगाई होत असल्याबाबत त्याच बरोबर बैठकीस उपस्थित सदस्यांच्या सुचना या विषयांवर सदर बैठक संपन्न झाली . त्यावेळी सभा अध्यक्ष विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी सर्व सदस्यांच्या समस्या व सुचना ऐकुन त्याबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, देशातील व राज्यातील सरकार पत्रकारांसाठी केवळ संरक्षणाचे कायदे करून अंमलबजावणी मात्र करीत नाही. त्यामुळे प्रसिध्दी माध्यमातील कर्मचाऱ्यांना व पत्रकारांना संरक्षण व आर्थिक फायदे मिळत नाही. म्हणुन आता पत्रकारांनी संघर्षसाठी संघटित होणे. गरजेचे आहे असे म्हणाले.
शेवटी संघटनेचे सेक्रेटरी विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी आभार मानुन सभा संपल्याचे जाहिर केले . सदर बैठकीस आरिफ एलाल, सौफी शेख, गफुर सौदागर, मुस्ताक शेख, ऐजाज शेख, हाजी जे.एम. शिकलगर, रमाकांत साळुखे, राजकुमार पवार, वामनराव निंबाळकर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here