पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ३० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या मोहिमेअंतर्गत देशभरात सेवा पंधरावडा घोषित केला होता या अनुषंगाने मोहोळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर, वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ, वृक्षारोपण तसेच असंघटित कामगारांना मोफत कायमस्वरूपी भोजन व्यवस्था अशा पद्धतीने उपक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून खा.जयसिद्धेश्वर महास्वामी, बांधकाम व अर्थ सभापती मा.विजयराज डोंगरे,शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.दत्तात्रय सावंत,जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री मा.लक्ष्मणराव ढोबळे, संजय (आण्णा) क्षीरसागर, शंकरराव वाघमारे, सुशील (भैय्या) क्षीरसागर, विश्वराज (भैय्या) महाडिक, तहसीलदार प्रशांत बेंडसे पाटील, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोलीचे प्राध्यापक संजय जोशी सर या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी मोहोळचे तालुकाध्यक्ष सुनील (दादा) चव्हाण यांनी दिली.

या कार्यक्रमास संपूर्ण मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी सर्व सदस्य सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाउपाध्यक्ष माऊली भगरे यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here