पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथे “भव्य रक्तदान” शिबिरापासून सेवा पंधरावड्यास शुभारंभ!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या मोहिमेअंतर्गत पंधरा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार: सुनिल (दादा)चव्हाण

मोहोळ भाजपाच्या वतीने राबविण्यात आलेला सेवा पंधरावडा हा एक स्तुत्य उपक्रम:पो.नि.अशोक सायकर साहेब

देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 22 ऑक्टोंबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या मोहिमेअंतर्गत पंधरवड्याची सुरूवात कै.शहाजीराव पाटील सभागृह मेन रोड मोहोळ येथे भव्य रक्तदान शिबिरापासून करण्यात आली आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक सायकर साहेब, भाजपाचे संजय (आण्णा) क्षीरसागर,राजन डोंगरे यांच्या शुभहस्ते या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.

मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून मोहोळ शहर व तालुक्यातून “भव्य रक्तदान” शिबिरास सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे अध्यक्ष मोर्चाचे अध्यक्ष तसेच सर्व भाजप प्रेमी,नागरिकांनी उपस्थित राहून आतापर्यंत १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सुनीलदादा चव्हाण यांनी दिली.

यावेळी कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक सायकर साहेब, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, लोकसेवक संजय (आण्णा) क्षीरसागर, सुशील (भैय्या) क्षीरसागर, ॲड.राजन डोंगरे,प्रकाश घोडके जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा,पांडुरंग (आण्णा) बचुटे जिल्हाध्यक्ष भाजप,पिंटु गोफणे, बाबासाहेब जाधव, मेजर लिंगदेव निकम, दिलीप गायकवाड,माऊली भगरे, दिपक गवळी,जगन्नाथ तोडकर,गणेश झाडे, महेश सोहनी,सुरेश पाटील, नितीन सोनटक्के,वैभव राऊत, महादेव पाटील,द्रोणा लेंंगरे, गुरुराज, सागर वाघमारे, महेेश धुमाळ, दिणू चव्हाण, शशिकांत गावडे, जाधव,उमेश माने,अंकुश आवताडे, विशाल पवार, सुशील मोटे,पांडुरंग धावणे, प्रकाश काका मुजी,अंजली काटकर, नवनाथ गावडे, सागर लेंगरे,सतीश पाटील, ज्ञानेश्वर माने,भारत आवारे, मान्यवर भाजपाचे, युवा मोर्चाचे, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here