पंढरीत मनसे व विठ्ठल परिवाराच्यावतीने गौरी- गणपती सजावट स्पर्धा. पंढरपूर येथील सर्वोत्कृष्ट मिरवणूक व विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या गणेश मंडळांना व घरगुती गौरी-गणपती सजावटीस मिळणार पारितोषिक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विठ्ठल परिवार यांच्या वतीने पंढरपूर येथे गणेशोत्सवानिमित्त सजावट स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये सार्वजनिक गणेशउत्सव मंडळांसाठी सर्वोत्कृष्ट मिरवणूक काढणाऱ्या मंडळास ५१ हजार हजार रुपये, दुतीय क्रमांक पटकावणाऱ्या मंडळास ४१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या मंडळास ३१ हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
याचबरोबर उत्कृष्ट देखावा आणि सजावट करणाऱ्या मंडळास प्रथम क्रमांकासाठी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
या गणेशोत्सवा दरम्यान सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या मंडळास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २१ हजार रुपये, दुसरा क्रमांक येणाऱ्या मंडळास १५ हजार रुपये आणि तिसरा क्रमांक येणाऱ्या मंडळाचे ११ हजार रुपये देण्यात येणार आहे. याचबरोबर घरगुती गौरी- गणपती उत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सर्वोत्कृष्ट गौरी- गणपती सजावट करणाऱ्या ५१ महिलांना पैठणी भेट देण्यात येणार आहे.
तरी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी ९३०७४५०९५४,९८६००७७२७२,८२०८४९३३१०,८०८०००१३८२ या नंबरशी संपर्क साधावा. तसेच घरगुती गौरी-गणपती साठी ७९७२५७२७१९,८३०८३९९७५० या क्रमांकाशी संपर्क साधावा.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here