पंढरीचं नाव इतिहासात-दिपक नाईकनवरे-यांचा सत्कार संपन्न.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

अंगी जिद्द व मेहनत करण्याची चिकाटी असली की कोणीही कधीच कोणाला रोखू शकत नाही. अशीच एक घटना पंढरपूर मध्ये घडलेली दिसून येत आहे. आईवडिलांच अंगी संस्कार मोठा भाऊ यांची लाख मोलाची साथ .वडिलांच छत हरपलं पण जिद्द काही केल्या बसू देत नव्हती.

वडिलांनी शिकवलेले संस्कार व जिद्दी पणा या सर्व गोष्टी मुळे मण कठोर झालेलं.अंगात कलेची आवड तर त्यामाध्यमातून अनेक पुरस्कार त्या सर्व गोष्टींला कवटाळून न बसता पुढील गरुड झेप घेत कलाकार क्षेत्रातून थेट क्रिकेट मैदानात कुस्ती रंगली आणि बघता बघता हे मैदान ऐवढे गाजले कि चक्क क्रिकेट देव म्हणून ओळखले जाणारे सर्वाचे आदर्श सचिन तेंडुलकर यांनी दखल घेतली.क्रिकेटचं मैदान अंपायर म्हणून असं गाजवलं कि देश व विदेशात चर्चा होत राहिली.या सर्व गोष्टी साठी मोठा भाऊ मेजर विक्रम नाईकनवरे तसेच मातोश्री यांनी अतोनात सहकार्य केले.देशपातळीवर न्युव अंपायर दिपक नाईकनवरे यांनी त्यांच्या सहकार्याचे मोल करून दाखवले.एका सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला दिपक हा जिद्दीच्या जोरावर देशपातळीवर पोहचला खरचं एक पंढरपूर करांन साठी अभिमानाची गोष्ट आहे. दिपक यांना मिळालेल्या यशामुळे पंढरपूर चे नाव इतिहासात जमा झाले आहे.

असे सर्व ठिकाणी चर्चा. सध्या त्यांची सर्व माध्यमातून प्रसिद्धी होताना दिसून येत आहे. त्यांना मिळालेले यशाचे औचित्य साधून देशपातळीवर प्रसिद्ध अंपायर हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता पत्रकार व गद्दारांची औलादकार अमर कांबळे व समाजसेवक तसेच दलित महासंघ सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख मा गणेश वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करून .पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.अंगी जिद्द व चिकाटी असली कि माणूस कोणत्याही परिस्थितीत यशाचे शिखरापर्यत पोहचू शकतो हे दिपक नाईकनवरे यांनी दाखवून दिले.ते अता युवकांचे आयडाँल बणले आहेत. त्यांना सर्व स्तरातून कौतुकाची थाप पाटीवर पडत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here