पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन गावठी कट्टे ( पिस्टल) जप्त करून केलेली उल्लेखनीय कामगिरी!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ७४ / २०२३ शस्त्र अधिनियम १९५६ चे कलम ३,७,२५ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयाची माहिती पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम अंबाबाई पटांगणा जवळ अंधारात उभा असून त्याचेकडे पिस्तुल सारखे हत्यार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे पंचासह सदर ठिकाणी गेले असता एक इसम लाईटचे उजेडात उभा असलेला दिसला. त्यास चाहुल न लागता घेराव घातला असता तो एकदम गोंधळुन गेला त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळुन आल्याने त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात येवून सदर आरोपीकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास करता त्याने त्याचेकडे घरात लपवून ठेवलेला दुसरा देशी बनावटीचा गावठी कट्टा काढून दिला आहे तो तपासकामी जप्त करण्यात आला आहे. मिर्झापूर ही वेबसिरिज पाहून आकर्षण वाटल्याने आपण हे केले असे आरोपीने सांगितले. तसेच त्याने सदरचा गावठी कट्टा हा मुळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी व सध्या पंढरपूर येथे राहणेस असलेला त्याचा साथीदार याचेकडुन घेतला असल्याचे सांगीतले आहे. सध्या दोन्ही आरोपी क्मा हे पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून सदरचे देशी कट्टा बाळगण्याचा नक्की उद्देश काय होता या बाबत तपास चालु आहे. सदरचा तपास पोसई आसबे हे करीत आहेत.सदरची उल्लेखनीय कामगीरी हि मा. पोलीस अधिक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे साो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. हिंमतराव जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, श्री. विक्रम कदम सो व श्री. अरूण फुगे सारे, पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि चिमणाजी केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ नागनाथ कदम, राजेश गोसावी, पोहेकॉ / ४१९ शरद कदम, पोहवा ३९६ सुरज हेंबाडे, पोहवा १०६३ ढेरे, पोना १७३६ सचिन इंगळे, पोना४८४ सुनिल बनसोडे, पोना १७८९ सचिन हॅबाडे, पोना१६५७ दादा माने, पोना५६२ राकेश लोहार, पोकॉ१२१६ शहाजी मंडले सायब शाखेचे पोका अन्चर आत्तार यांनी केली आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ७४ / २०२३ शस्त्र अधिनियम १९५६ चे कलम ३, ७,२५ मधे अटक केलेले आरोपी नाव पत्ता १) धनाजी सिध्देश्वर आटकळे वय ३८ वर्षे रा. शेगांव दुमाला ता. पंढरपूर
(२) सहजराम मताऊ वर्मा वय ३६ वर्षेरा. मनकापूर जिल्हा गोण्डा (उत्तर प्रदेश राज्य) सध्या नागालँड हॉटेल पाठीमागे, पंढरपूर जिल्हा सोलापूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here