पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विकास कामांना १ कोटी रुपये मंजूर – आ. समाधान आवताडे

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते,ही बाब विचारात घेऊन शासनाची लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग या विभागाकडे आ. आवताडे यांनी सदर निधीची मागणी केली होती. सन २०२१ – २२ या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणाला आवताडे यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे त्या दृष्टीने या शासकीय विभागाकडे मागणी करून सदर भरीव निधी मंजूर केला आहे नुकताच पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांना ५ कोटी निधी आणला असून दोनच दिवसांमध्ये ग्रामीण भागातील विकास कामांनाही १ कोटींचा निधी उपलब्ध करून आणला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

पंढरपूर तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे –

रांझणी ते एकलासपूर रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख,अनवली येथील सिद्धनाथ मंदिर ते शेख वस्ती मुरूमीकरण व खडीकरण करणे ३ लाख,गोपाळपूर येथील इंदिरा कॉलनी अंतर्गत गटार बांधणे ७ लाख, कोर्टी येथील महादेव ननवरे वस्ती ते सुभाष काळे वस्ती रस्ता मुरूमीकरण व खडीकरण करणे ३ लाख,गादेगांव येथील लक्ष्मीनगर ते सोनके शिव खडीकरण करणे ४ लाख, कौठाळी येथील जयराम वस्ती ते बंधारा रस्ता खडीकरण करणे १० लाख, शिरढोण येथील सब स्टेशन ते चांगदेव व्हळगर वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, खर्डी येथील चव्हाण वस्ती रामोशी मळा ते शिरभावी रस्ता मुरूमीकरण व खडीकरण करणे १० लाख.

 मंगळवेढा तालुक्यासाठी गावांना मंजूर झालेली कामे 

रहाटेवाडी येथील हनुमान मंदिर ते जि. प. शाळा रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, मुंढेवाडी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय ते घोडके वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, कर्जाळ येथील कर्जाळ ते गैबीपीर मंदिर रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ५ लाख, कर्जाळ येथील कर्जाळ गैबीपीर मंदिर रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, कात्राळ येथील हायवे ते कारंडे वस्ती रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, चोखामेळा नगर येथील धनाजी खवतोडे ते सोमनाथ बुरजे घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख,डोंगरगाव येथील डोंगरगाव ते हाजापूर शिव रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ४ लाख, डोंगरगाव येथील डोंगरगाव ते खोमनाळ रस्ता शेंबडे-पठाण-चव्हाण-वस्ती मार्गे जाणारा रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, डोणज येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे २ लाख, अरळी येथील स्मशानभूमी बंधारा रस्त्यावरील सर्व रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे ३ लाख, खवे येथील बिस्टाव्वा देवी ते मारुती मंदिर कॉंक्रिटीकरण करणे ३ लाख, आंधळगाव ते गोणेवाडी रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करणे ५ लाख, आंधळगाव येथील जिल्हा परिषद शाळा ते काळंबादेवी मंदिर गटार करणे २ लाख, मुंढेवाढी येथील बिस्किटे वस्ती-उत्तम कांबळे घर-भोंगळे वस्ती रस्ता मुरुमीकरण खडीकरण करणे ४ लाख या कामांना निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरवात होईल असी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here