पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीवर बोधिवृक्षपूजनातून निसर्ग संवर्धनाचा संदेश 

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब
(धम्मचक्र अनुप्रवर्तनदिनी पंढरीतील नागरिकांची एक अनोखी अध्यात्मिक सुरुवात)
अशोक विजयादशमी तथा ६५ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमीत्त सम्यक क्रांती मंचच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद प्रस्तावित बुद्धभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री मा.ना. रामदास आठवले यांच्या शुभहस्ते रोपित केलेल्या बोधिवृक्षाची पूजा आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी भारतीय महासंघ पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. सौरभ मिश्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. वसंत पवार यांनी त्रिशरण – पंचशील ग्रहण केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. मिश्रा यांनी, मी तथागतांनी पावन केलेल्या बिहारमध्ये जन्मलो आणि त्याच तथागताच्या पंढरीतील बुद्धभूमीवर भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्याची आणि श्रीलंकेतील महाबोधिवृक्षाच्या बिजातून अंकुरलेल्या बोधिवृक्षाला वंदन करून जलसिंचीत करण्याची संधी मला प्राप्त झाली. मी धन्य झालो. ही संधी मला सम्यक क्रांती मंच ने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आणि पंढरपूर नगरपरिषदेचे आभार मानतो. या बुद्धभूमीच्या विकासासाठी तन मन धनाने मी व्यक्तिशः आणि माझी पार्टी कटीबद्ध आहे. असे प्रतिपादन केले.
यावेळी पंढरीतील श्री. प्रभाकर व सौ. पद्मिनी लोंढे, श्री. मधुकर व सौ. राणी गायकवाड, श्री. ज्ञानेश्वर व सौ. सीता वाघमारे, श्री. मोहन व सौ. नेहा गायकवाड , श्री. राजू व सौ. शालन बंगाळे, श्री. राजू व सौ. सीमा वाघमारे, श्री. 
स्वप्नील व सौ. माधुरी गायकवाड, श्री. निलेश व सौ. मोनाली सोनवणे, श्री. अक्षय व सौ. प्रियांका दंदाडे, आदी दाम्पत्यांनी बोधीवृक्षाची पूजा करून त्यास मनोभावे जलसिंचीत केले.
याप्रसंगी धम्ममित्र प्रभाकर सरवदे आणि शरद दंदाडे यांनी बोधिवृक्ष पूजा गाथेचे पठण केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक सम्यक क्रांती मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे यांनी केले तसेच सहसचिव स्वप्नील गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि खजिनदार रविंद्र शेवडे यांनी आभार व्यक्त केले. 
या कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक बाळू भंडारे, ओ बी सी नेते कालिदास(अण्णा) जाधव, समाजसेवक महादेव कांबळे, इंजिनिअर निलेश जाधव, युवानेते उमेश सर्वगोड, आशिष लांडगे, वैशाली बनसोडे, पुष्पा गायकवाड तसेच सोमनाथ वाघमारे, किरण शिंदे, लखन ढवळे, ऋषिकेश चंदनशिवे, राजन गायकवाड, अक्षय वाघमारे, गणेश बनसोडे, अजय ढवळे, रोहित ढवळे, तुषार वाघमारे, गौरव वाघमारे, शाहू दंदाडे, आदित्य वाघमारे, नेहा गायकवाड, प्रियांशू लोंढे, शिवानी दंदाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here