पंढरपूर- ति-हे मार्गे रस्त्यासाठी भाजपा आक्रमक.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर- ति-हे मार्गे रस्त्यासाठी भाजपा आक्रमक.

भाजपा खासदार, आमदारांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबर रोजी रस्तारोको आंदोलन.

सोलापूर // प्रतिनिधी

वर्षानुवर्षे रखडलेल्या पंढरपूर, सुस्ते, टाकळी सिकंदर, कुरुल रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या मागणीसाठी भाजपा आक्रमक झाले असून भाजपा खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबर रोजी टाकळी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष म्हस्के यांनी यांना दिला आहे.
पंढरपूर येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव भाजपा किसान मोर्चा माऊली हळणवर, पंढरपूर तालुका अध्यक्ष भास्कर कासगावडे, बादलसिंग ठाकूर, रोहित उर्फ लाला पानकर, किरण वाडेकर, बिरुदेव मासाळ, शंकर साठे, गुंडीबा मदने, उमेश पानकर, संतोष झेंडे, ऋतिक भिंगारे, सुदाम शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर,सुस्ते,टाकळी सिकंदर, कुरुल (ति-हे मार्गे) रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या भागातील नागरिकांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होत आहे. एसटी सेवाही बंद आहे पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वच गावांना या रस्त्यावरून ये जा करावी लागते तर विविध साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस या मार्गाने कारखान्याकडे जातो तर विविध शेतमालाला दुधाची वाहतूक करणारी वाहने यांचाही या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने व्हावे. यासाठी विविध गावाच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत अनेक वेळा आंदोलने केली. रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिण्यात आले. मात्र या भागातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष असल्याने या भागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्ता तात्काळ करण्यात यावा. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपाचे खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत २४ सप्टेंबर रोजी टाकळी चौक ता मोहोळ येथे भव्य रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here