पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा झटका!आ.समाधान दादा अवताडे यांनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला लावले गळाला! इथून पुढे आपण सर्वजण समाधान दादांच्या सोबत जाऊया राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठे खळबळजनक विधान!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार समाधान दादा अवताडे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे मतदान असलेल्या कासेगाव या ठिकाणी सर्व आपल्या मतदारसंघातील व गावातील मतदारांना सदिच्छा भेट दिली यावेळी सर्व अवताडे गटातील सर्व समर्थक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण असलेल्या व राजकीय दृष्ट्या त्याला महत्त्व असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPC), सदस्यपदी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार,स्वाभिमानी, लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे, कासेगाव यांचा ग्रामस्थांच्या वतीने, जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तसेच भालके समर्थक असणारे विजयसिंह देशमुख (दादा), यांनी आमदार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या मागे आपण सर्वजण विकासासाठी जाऊया असे मत व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत कासेगाव कासेगाव गावातील नेते माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ गावधरे, प्रशांत भैय्या देशमुख, विजयसिंह दादा देशमुख, समाधान घायाळ, राजाभाऊ घायाळ, लक्ष्मण जाधव, त्याचबरोबर काशिगाव व पंचक्रोशीतील आलेले सर्व आमदार समाधान दादा अवताडे यांच्यावर प्रेम करणारे बहुसंख्य पदाधिकारी समर्थक व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here