पंढरपूर तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे सापडली अल्पवयीन मुलगी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे सापडली अल्पवयीन मुलगी

(केवळ 40 तासात लावला अल्पवयीन पीडित बालिकेचा शोध)

सोलापूर // प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपूर्वी १७ ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलीस आरोपी समर्थ राजू कांबळे रा.आढीव,ता.पंढरपूर याने लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने पळवून नेले असल्याबाबत गुन्हा नोंद झाला होता.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार नितीन चवरे यांच्याकडे देण्यात आला.त्यानंतर पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शना खाली वेगाने तपासाची चक्रे फिरवली.

त्यानंतर तपास करत असताना सदर गुन्हयातील आरोपी समर्थ राजू कांबळे हा जत,जि.सांगली येथे असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.ही माहिती मिळताच पोलीस हवालदार नितीन चवरे व पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी तात्काळ जत,जि. सांगली येथे जाऊन खात्री केली असता आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीस घेऊन कराडकडे पोबारा केल्याचे समजले.तरीदेखील चवरे व कदम यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीच्या आधारे कराड,जि.सातारा येथे जाऊन केवळ 40 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या व पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. सदर मुलीस कायदेशीररित्या तिच्या आईच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले आहे. सदरच्या गुन्ह्याची गंभीरता पाहून व तपासाअंती गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आली आहे.
गेल्या चार महिन्यात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण १२ अल्पवयीन मुली घरातून पळाल्याच्या किंवा फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने तपास करत यापैकी ११ मुलींचा शोध घेण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे.त्यामुळे तालुका पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
त्यातच कालच ४० तासात अल्पवयीन मुलीचा शोध लावल्याने तालुका पोलिसांची दमदार कामगिरी यानिमित्ताने दिसून आली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे व पंढरपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार नितीन चवरे,पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अन्वर आत्तार यांनी अतिशय शितफीने पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांच्याकडे देण्यात आला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here