पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई; १३८ किलो चंदनासह दोघे अटकेत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पंढरपूर-मोहोळ रस्त्यावरील तीन रस्ता चौकातील पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी कारवाई करत तब्बल १३८ किलो चंदन जप्त केले. या जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख ९७ हजार ४०० रुपये इतकी आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पेनूर (ता.मोहोळ) येथून एक सिल्व्हर रंगाची कार (एमएच ४२ के ७६११) मधून दोन व्यक्ती पोत्यामध्ये सुंगधी चंदनाची ओली लाकडे घेऊन पंढरपूरकडे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले. त्यानंतर मोहोळ बाजूकडून येणारी पाच-सहा वाहने तपासली. त्यात एक कार वेगात येताना दिसली. त्यानंतर ती कार थांबवून तिची पाहणी केली असता त्यामध्ये चार पांढरे नायलनची पोती आढळून आली. त्यामध्ये १३८ किलो चंदनासह इतर काही गोष्टी आढळल्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here