पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी हनुमंत मोरे सर पंढरपूर शहर अध्यक्षपदी अमर सूर्यवंशी एकमताने निवड! (शेतकरी सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी भर देणार:-हनुमंतराव मोरे)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारणीमध्ये मोठे बदल करण्यात आले असून पंढरपूर तालुकाध्यक्षपदी हनुमंत मोरे यांची निवड करण्यात आली आहे. मोरे हे भोसे गावचे रहिवासी असून, अनेक वर्षापासून पक्षाचे काम करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुकाध्यक्षांच्या नूतन निवडी प्रदेश पातळीवर जाहीर करण्यात आल्या आहेत.या निवडींबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.प्रदेश काँग्रेसचे हे पत्र ३० डिसेंबर रोजी प्राप्त झाले आहे.

हनुमंत भगवान मोरे कल्याणराव काळे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. कल्याणराव काळे काँग्रेसमध्ये असताना त्यांची नाळ माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी जुळली. तेव्हापासून त्यांनी काँग्रेसचे काम पूर्ण निष्ठेने केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अकोला दौऱ्यातही ते सामील झाले होते. त्यांची तालुका अध्यक्षपदावर निवड होणे, ही त्यांना काँग्रेसने दिलेली निष्ठेची पोचपावतीच आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा काँग्रेसचे सहसचिव , सचिव आदी पदे भूषवली असून काँग्रेसने आता तालुक्याची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली आहे.

चौकट-
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माननीय राहुलजी गांधी महाराष्ट्राचे नेते नानाभाऊ पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व सोलापूरचे जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती निस्वार्थपणे पार पाडून सर्व गावातील व ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याकडे मी भर देणार आहे!
हनुमंतराव मोरे
(नूतन तालुका अध्यक्ष पंढरपूर तालुका)

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here