पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा संपन्न

पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २०/९/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीचे सभापती मा.श्री. दिलीप तुकाराम घाडगे साहेब यांच्या अध्यक्षते खाली व सोलापुर जिल्हयाचे आमदार मा.श्री. प्रशांतराव परिचारक साहेब, चेअरमन पांडुरंग सह. साखर कारखाना लि., श्रीपुर यांचे प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झाली..

यावेळी पांडुरंग सह. साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मा. श्री. प्रशांतराव परिचारक साहेब बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठी द्राक्षाचे सौदे कामकाज सुरू करावे. आणखीन नवीन कांही करता येईल का ते पहावे. बाजार समिती मार्फत व्यापार वाढीसाठी भविष्यात आनखीन सोयी सुविधा पुरविल्या जातील. नवीन प्रकल्प राबविले जातील. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविल्या जातील असे सांगुन बाजार समितीच्या कामकाजाचे कौतुक केले..

सुरूवातीला बाजार समितीचे सभापती मा श्री दिलीप तुकाराम घाडगे साहेब यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करून जिल्हयाचे आमदार मा. श्री प्रशांतरावजी परिचारक साहेब यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या बाजार समितीचे काम चालु असुन बाजार समितीस सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ठ कार्याचा कै. वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार २०१८ मिळाला. असल्याचे सांगून बाजार समितीच्या विविध विकास कामकाजा बाबत माहिती दिली. तसेच वरचेवर शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व बेदाणा, डाळिंब, केळी, कांदा सौदया बाबत माहिती दिली. सध्या बाजार समिती मध्ये संगणकीकृत लिलाव पध्दती चालू केलेली असुन कामकाजात सुसुत्रता व पारदर्शकता येत असल्याची माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांकरिता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचे कडील शेतमाल तारण कर्ज योजना राबवीत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सुचित केले. तसेच डाळींब मार्केट करिता काँकीटीकरण, स्वतंत्र गाळे व सेलहॉल, कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक मालकांचा पुतळा उभारणे, रस्ते, सौर उर्जा प्रकल्प, इत्यादी कामे करणार असले बाबत सांगितले.

यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. सोमनाथ डोंबे यांनी आमदार मा. श्री. प्रशांतरावजी परिचारक साहेब यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या आवारातील विविध सोयी सुविधा केलेल्या असून बाजार समितीची वरचे वर भरभराट होत आहे. शेतकरी आडते, व्यापारी यांची चांगली सोय होत असून आवश्यकते नुसार सोयी सुविधा दयाव्यात आम्ही व्यापारा मध्ये वाढ करू असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

पांडुरंगचे माजी चेअरमन मा. श्री. दिनकरभाऊ मोरे यांनी बाजार समिती प्रगतीपथावर जात असले बाबत सांगून शेतकन्यांच्या मालाला योग्य भाव मिळणे करिता बाजार समिती चांगले काम करीत आहे व आनखीन सोई-सुविधा कराव्यात असे सुचित केले. विषय वाचन व अहवाल वाचन सचिव श्री कुमार घोडके यांनी केले. बाजार समितीचे सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न रु.३,८६,२४,९६३ /- झाले असून एकूण खर्च रू.२,८१,७०,००४/- इतका वजा जाता सरप्लस / वाढावा १,०४,५४,९५९/- इतका झालेला आहे. बाजार समितीची वार्षिक उलाढाल ४३० कोटी रूपये झालेली आहे. सध्या बाजार समितीत संगणकीकृत लिलाव पध्दत चालू केलेली असुन भुसार सौदे कामकाज चालू आहे. टप्याटप्याने फळे व भाजीपाल्याचे सौदे कामकाज होणार असल्याचे सांगून बाजार समितीने बाजार आवार वॉल कंपाऊंड, सेलहॉल, शॉपिंग सेंटर, स्वच्छता गृह, अंतर्गत रस्ते, वे ब्रिज, ऑक्शन सेलहॉल, दक्षिण गेट कमान, गांडूळ खत प्रकल्प इ.विविध विकास कामे पुर्ण केलेली आहेत. भविष्यात आनखीन सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

शेवटी उपसभापती मा. श्री. विवेक देविदास कचरे (काका) यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सां. सहाय्यक श्री. गजेंद्र जोशी यांनी केले.

या सभेस पांडुरंग सह. साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन मा. श्री. दिलीपराव चव्हाण, व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे (सर), पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री. प्रशांतभैय्या देशमुख, बाजार समितीचे माजी उपसभापती मा. श्री. लक्ष्मणराव धनवडे, मा.श्री संतोष घोडके, माजी संचालक, श्री दत्तात्रय ताड, मा. श्री. भास्कर कसगावडे, मा. श्री. माऊली हळणवर, मा.श्री.मालोजी शेंबडे, सुस्तेचे माजी सरपंच मा. श्री. अनिलकाका घाडगे, मा.श्री. विजय चव्हाण, मा. श्री हिरालाल शेख, डाळींब असोसिएशन अध्यक्ष मा. श्री. नागेश काका कुलकर्णी, श्री. अ. रशिद बागवान, श्री मुकुंददास मर्दा, श्री. आनंद शेटे, श्री. बाळासाहेब नवाळे, श्री सोमनाथ आंबरे, व्यापारी कमिटीचे चेअरमन मा. श्री. सतिश लिगाडे तसेच व्यापारी मा. श्री. सुरेशदादा कुलकर्णी, मा.श्री. सुभाष मस्के सर, मा. श्री. महावीर फडे, मा. श्री. इकबालभाई बागवान, मा. श्री. राहुल म्हमाणे, श्री. प्रकाश कुलकर्णी, श्री. संजय मस्के, श्री. शब्बीरभाई बागवान, श्री. आखलाख बागवान, श्री धीरज म्हमाणे, श्री जोतीराम सासवडकर व बाजार समितीचे संचालक मा. श्री. पोपट गजेंद्र देठे, मा. श्री. महादेव चंदुलाल घाडगे, मा. श्री. निलकंठ बाबूराव इनामदार, मा. श्री. मोहन बयाजी खरात, मा. सौ. मनिषा भास्कर शिंदे, मा.श्रीमती मालन मोहन मोरे, मा. श्री. रघुनाथ पाटलु गोडसे, मा. श्री देवीदास भगवान ढोणे, मा. श्री. रमेश ज्ञानोबा गाजरे, मा. श्री. धनाजी वसंत यादव, मा.श्री.बाळासो रखमाजी चंदनशिवे, मा. श्री बिंटू जगन्नाथ करवर, मा.श्री. शैलेंद्र गंगाधर नवाळे, मा. श्री सिकंदर महंमद बागवान, मा. श्री. आबाजी औदुंबर शिंदे तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे प्रतिनिधी, हमाल पंचायत प्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, आडते, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समितीचे अधिकारी श्री. अरुण कवडे, श्री. संजय माने व कर्मचारी आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here