पंढरपूर उपनगर येथे मेघा कॅम्प आरोग्य शिबीर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज दिनांक ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे आणि EQUITAS DEVELOPMENT INITIATIVES TRUST यांच्या संयुक्त विद्यमाने  शिवसेना संपर्क कार्यालय, जुना कराड नाका, गाताडे प्लॉट, पंढरपूर  येथे मेघा कॅम्प आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.

                 यावेळी श्री विठ्ठल मूर्तिला पुष्पहार घालून शिबिराचे उदघाटन डॉ. वृषभ फडे, MBBS, MD यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी प्रमुख उपस्थित  शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख मा.संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक तथा माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख जयवंत आण्णा माने, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, रामचंद्र अष्टेकर, सौ.चंचला बुराडे, सौ.शारदा कांबळे, सौ.सुवर्णा ढाळे, सौ.वैष्णवी अष्टेकर, सौ.दीपाली बागडे, सौ.मीनल अष्टेकर, सौ.जुंदळे, सौ.आशा बेद्रेकर, सौ.सुजाता हाडमोडे, लता बागडे, अतुल खंडागळे, शेखर ननवरे आदी उपस्थित होते.
             शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके यांनी माहिती दिली, निरोगी आरोग्य कसे ठेवावे याबद्दल डॉ. वृषभ फडे, MBBS, MD यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ.सागर गांधी, BDS, MDS यांनी आभार मानले. कार्यक्रम संपन्न करण्याकरीता EQUITAS DEVELOPMENT INITIATIVES TRUST चे ब्रांच मॅनेंजर ( BM ) अभिजित बनसोडे साहेब, ABM अशोक जाधव साहेब, CSR ऑफिसर प्रमोद पवार साहेब यांनी विशेष सहकार्य केले, शिबीरामध्ये एकूण ३५  शिबिरार्थी यांची आरोग्य तपासणी संपन्न झाली…
                 या शिबिरामध्ये बीपी, ब्लड, ecg, हृदयरोग, थायरॉईड, दंत विकार आदी तपासणी घेण्यात आले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here