पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक व कर्मचारी यांचे वतीने नेत्ररोग निदान व चष्मा वाटप शिबीर संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक व कर्मचारी यांचे वतीने नेत्ररोग निदान व चष्मा वाटप शिबीर संपन्न

पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते तथा पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा कर्मयोगी श्रध्येय स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त त्यांचे विचारांचे पाईक म्हणून पंढरपूर अर्बन बँकेचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने पंढरपूर अर्बन बँकेचे कर्मयोगी सभागृह येथे नेत्ररोग निदान व गरजूंना चष्मा वाटप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे वेळी सर्व प्रथम सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख व पांडुरंग परिवाराचे नेते सुरेशभाऊ आगवणे यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या शिबारामध्ये ४१३ लोकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतल्याची माहिती कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक करताना बँकेचे संचालक हरीश ताठे यांनी दिली व आवश्यक असणाऱ्या अशा २५० हून अधिक जणांना चष्मा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर बँकेचे माध्यमातून नोंदणी केलेल्या सभासद ग्राहकांना नामवंत डॉक्टर यांचे क्लिनिक मध्ये डोळ्यांची तपासणी करून घेण्यात आली होती. एस.पी.कुलकर्णी सर यांनी आभार मानले.    

मोठे मालक हे राजकारणातील जाणकार तर होतेच त्याच बरोबर सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे सबंध होते अशी त्यांचे विषयी माहिती देत बँकेचे संचालक उदय उत्पात यांनी मोठ्या मालकांना अभिवादन केले. तसेच बँकेचे माजी संचालक डॉ दीपक अचालारे यांनी मोठ्या मालकांच्या स्मृतीस उजाळा देताना पंढरपुरातील सर्व डॉक्टर आणि मोठे मालक यांची मदत याविषयी आठवणी सांगितल्या. त्यांचा स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या विचारांशी एकरूप होऊन हा कार्यक्रम झाला असल्याचे मत सर्व डॉक्टर बांधवांचे वतीने त्यांनी व्यक्त केले. 

श्रध्येय मोठ्या मालकांनी ज्याप्रमाणे आपल्या कार्यातून अनेकांना विकासाची दृष्टी दिली त्याच विचारांचे पाईक होऊन बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचेवतीने त्यांचे स्मरण करीत असताना गरजूंना चष्मा देत आहोत असा विचार आ.प्रशांत परिचारक यांनी कार्यक्रम प्रसंगी मांडला व असेच समाज उपयोगी कार्यक्रम घेत राहू असे त्यांनी यावेळी सांगितले.

     या शिबिरासाठी पंढरपूर शहरातील नामवंत नेत्र चिकित्सक डॉ अचालारे, डॉ लोटके, डॉ मनोज भायगुडे, डॉ कारंडे, डॉ शहापुरे व डॉ किरण बहिरवाडे यांनी आपले बहुमोल योगदान दिले व मोफत रुग्णाची तपासणी करून दिली याबद्दल आयोजकांचे वतीने त्यांना गौरव चिन्ह, कृतज्ञता पत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेबद्दल व कोरोनाकालातील उत्कृष्ठ कार्याची दखल घेत डॉ.धोत्रे यांना देखील गौरविण्यात आले. कोणत्याही प्रकारे नफ्या तोट्याचा विचार न करता योग्य भावामध्ये चांगल्या प्रकारचे चष्मे देण्यात आले बदल अरिहंत कोठडिया यांना हि सन्मानित करण्यात आले.

कोरोना पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांचे उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला व ठराविक व्यक्तींना प्रतिनिधिक स्वरुपात चष्मा वाटप करण्यात आले. यावेळी नागेश भोसले, विवेक परदेशी, बँकेचे व्हाईस चेअरमन दीपक शेटे, रजनीश कवठेकर, चंद्रकांत निकते, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, रेखा अभंगराव, माधुरी जोशी, मुन्नागीर गोसावी, मनोज सुरवसे, भालचंद्र कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, सरव्यवस्थापक राम उन्हाळे आदि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here