पंढरपूरच्या राजकारणातील काळे -पांढरे, (पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमरजीत पाटील यांची फेसबुक पोस्ट)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

दि.पंढरपूर अर्बन को-ओप बॅंकची निवडणुक बिनविरोध झाल्याचे समजले आहे.बॅंकेवर सत्ताधारी परिचारक गटाचे वर्चस्व आणि मजबुत पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

अर्बन बॅंकेसाठी विरोधकांनी घालव त्याला पकडून विरोधकाची कडबुळं बांधण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता.तो किती हस्यास्पद होता हेच यातून सिद्ध झालेले आहे.पंढरपूरच्या राजकारणात सभ्येतेची परंपरा कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी जोपासली होती.परंतु,गावभरच्या लायकी नसलेल्या माणसांना जवळ बसवून घेऊन,त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची प्रथा पुढच्या पिढीतील नेत्यांनी सगळी नितिमत्ता गुंडाळून ठेवून निर्माण केली.पंतांनंतरच्या पिढीचा हा उद्योग प्रामुख्याने कर्मवीर औदुंबरआण्णांचा गट संपवण्यासाठी केलेला राजकीय खाटाटोप होता.परंतु,गावभरच्या उंडग्यांना पाठबळ दिल्यानंतर ते अथवा त्यांची प्रवृत्ती कधी ना कधी आपल्याही अंगलट येऊ शकते ? याचा परिचारकांच्या पुढच्या पिढीने विचार केला नाही.आणि अशाच लोकांनी परिचारकांचे आमदारकीचे सार्वजनिक जीवनातील राजकारण संपवले हे वास्तव आहे.म्हणून ते जनतेमधून आमदारकीला कधीच निवडून येऊ शकले नाहीत.हे असेच चालत राहिले तर यावरुन भविष्यात काय होईल याचा अंदाज पंत परिचारक गटाच्या नेतृत्वाला आमच्यापेक्षा लवकर लक्षात आला असेल अशी आम्हाला आशा आहे.

पंढरपूरच्या राजकारणात ज्यांची साधे नगरसेवक म्हणून निवडूण यायची बोंब आहे असे महाभाग मोठमोठ्या आर्थिक,सहकारातील संस्थारुपी उंटाच्या पार्श्वभागाचा मुक्का घेण्याचा प्रयत्न करत आहेत.यामध्ये भरीस भर “…तुम्हारी दौलत नई नई है !” नटबोल्ट पासून सगळी माहिती असणार्‍यांची पडली आहे.एका शुल्लक विजयामुळे आपले हात आभाळा ठेकल्याचा साक्षात्कार या महाशयाना होत आहे.मी याला बघून घेईन…मी त्याला बघून घेईन…आणि मी त्याला ही बघून घेऊनची घमेंडी आणि हुकूमशाही वृत्ती असणार्‍यांनी कुचाळकीचे राजकारण न करता,खुल्या मैदानात इमानदारीने एकदा भिडावे.जातीवंत प्रश्नाला खानदानी जवाब मिळाल्या शिवाय राहणार नाही.

या सगळ्यामध्ये जनतेला काहीच समजत नाही,अशा भ्रमात राहणार्‍या पंढरपूरच्या नेत्यांनी देशाचे सर्वोच्च नेते असणार्‍या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी सुद्धा आपले आत्मचरित्र जनतेच्या “सामुहिक शहाणपणाला” अर्पण केलेले आहे.येवढे लक्षात घेतले तरी पुरे होईल.बाकी…

दि.पंढरपूर अर्बन को – ऑप बॅंकेच्या एकतर्फी विजयाबद्दल परिचारक गटाचे हार्दिक अभिनंदन…बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालक मंडळाच्या पुढिल वाटचालीस हार्दिक सदिच्छा!

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here