पंढरपुरात वडार समाजाचा मोर्चा मयत कृष्णाच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध घ्या. मयत कृष्णा धोत्रे याचा तपास सीबीआय, सीआयडी या स्वातंत्र्य यंत्रणाकडे द्यावा.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मयत कृष्णा धोत्रे या प्रकरणाचा तपास सीबीआय, सीआयडी या स्वतंत्र संस्थेकडून करण्यात यावा. मयत कृष्णा धोत्रे याच्या मारेकाऱ्यांचा शोध त्वरित घ्यावा.
या मागणीसाठी पंढरपूर येथे वडार समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता.
सदर मोर्चा येथील महात्मा फुले पुतळ्यापासून निघाला पुढे चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेशन रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिलांच्या हस्ते तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मागण्यांची शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये बहुसंख्येने वडार समाज बांधव त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
या मोर्चास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संघटनांनी पाठिंबा दिला होता.

गेली दोन महिन्यापूर्वी कृष्णा तिम्मा धोत्रे हा अचानकपणे गायब झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारील असणाऱ्या सार्वजनिक शौचालयामध्ये आढळून आला. तसेच मृत कृष्णा धोत्रे यांच्या शरीरातील काही अवयव देखील गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मयत कृष्णा धोत्रे यांच्या कुटुंबीयांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे धाव घेतली.
तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी जनावराने हल्ला केल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मात्र मृतदेहाच्या शरीरातील काही अवयव देखील गायब झाल्याने बालकाचा अपहरण करून खून केला असल्याची तसेच यामध्ये जादूटोणा कृत्यातून हा खून झाला असल्याचा संशय मृत कृष्णा धोत्रे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता.

मात्र या प्रकरणाचा अद्याप पर्यंत सखोल तपास पंढरपूर शहर पोलिसांनी केला नाही.
असा आरोप यावेळी करण्यात आला.

सदर घटना ही अतिशय गंभीर स्वरूपाचे असून मृत देहावरील जखमा पाहता त्या कोणत्याही जनावरांनी केलेल्या नसून ते मानवी कृत्य असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यामध्ये बालकाचे अपहरण करून खून केल्याची गंभीर घटना असल्याचा आरोप व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच सदर प्रकरण हे जादूटोणा कृत्यातून देखील केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत मयत कृष्णा धोत्रे याच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून घटनेचा संपूर्ण तपास सीबीआय, सीआयडी या स्वतंत्र संस्थेकडून करण्याच्या मागणीसाठी सोमवारी पंढरपुरात वडार समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे ,सुरेश धोत्रे, दगडू घोडके ,वामन बंदपट्टे, संजय बंदपट्टे ,सुधीर धोत्रे ,भैय्या पवार,दत्ता भोसले ,लखन चौगुले, दयावान ग्रुपचे लखन चौगुले, अंबादास धोत्रे, दत्ता धोत्रे ,, सुधाकर बंदपट्टे ,विठ्ठल बंदपट्टे,लक्ष्मण तात्या बंदपट्टे, एडवोकेट राजेश चौगुले, दिलीप चौगुले, पिंटू पवार ,रविराज शिंदे, नागनाथ शिंदे , संतोष धोत्रे, अर्जुन पवार, अण्णा पाटील,अंबादास धोत्रे, शंकर चौगुले, गफूर धोत्रे, चनाप्पा चौगुले, तमाशा घोडके, धर्मराज घोडके, रघुनाथ पवार ,राजू पवार ,भारत पवार, शिवाजी मस्के, बजरंग बंदपट्टे, राम धोत्रे, आण्णा पाटील,इत्यादी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here