पंढरपुरात दुचाकी चोरांची टोळी गजाआड;21 लाखांच्या 64 दुचाकी गाड्या घेतल्या ताब्यात! (पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या टिमची यशस्वी कामगिरी)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर सह शेजारील सांगली,सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यातून विविध कंपन्यांच्या दुचाकी चोरणार्या टोळीचा पंढरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी सांगोला तालुक्यातील पाच आणि पंढरपूर तालुक्यातील तीन अशा आठ दुचाकी चोरांना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.

यामध्ये 21 लाख 30 हजार रूपये किंमतीच्या 64 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अलीकडच्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई‌‌ करण्यात आली आहे.
या संदर्भात सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here