पंढरपुरातील हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सचे विविध मान्यवरांच्या हस्तै उद्घाटन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपुरातील हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सचे विविध मान्यवरांच्या हस्तै उद्घाटन

 

(पंढरीतील हाऊस ऑफ कॅम्प्युटर्स तंत्रज्ञानाचे नवे दालन – आ. शहाजी पाटील)

सोलापूर // प्रतिनिधी

कॉम्प्युटर क्षेत्रात अग्रगण्य कंपनी म्हणून परिचित असलेल्या हाऊस ऑफ कॉम्प्युटरची पंढरपूर मधील शाखा तंत्रज्ञानाचे नवे दालन आहे बहुजन समाजातील युवक आता विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी दाखवू लागले आहेत, असे मत आ.शहाजी पाटील यांनी व्यक्त केले. पंढरपूर शहरातील हाऊस ऑफ कम्प्युटर्स च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे राष्ट्रवादी नेते कल्याण काळे नागेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

पंढरपूर शहरातील सरगम चौकातील एचडीएफसी बँकेच्या शेजारी हाऊस ऑफ कम्प्युटर्स या शाखेचे उद्घाटन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संपन्न झालेल्या या उद्घाटन समारंभास जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख ,विठ्ठल कारखान्याचे संचालक महादेव देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे ,हनुमंत मोरे, सुधाकर कवडे, बंडू पवार, आनिल नागटिळक, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते .आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले. याप्रसंगी या फर्मचे चालक सुशांत बागल यांच्या वतीने उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कर्मवीर भाऊराव पाटील, स्व.यशवंतराव चव्हाण या महान विभूतींच्या आशीर्वादाने बहुजन समाजातील युवक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेत आहे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे. पंढरपूर मधील नव्याने स्थापन झालेली हाऊस ऑफ कॉम्प्युटरची शाखा तंत्रज्ञानाचे नवे दालन आहे. पंढरपूर तालुक्यातील युवकांनी या फर्मचा फायदा करून घ्यावा .असे मत याप्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले

यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यापार आणि उद्योग सेलचे नूतन प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हाऊस ऑफ कॉम्प्युटर्सचे चालक सुशांत बागल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here