पंढरपुरातील संकल्प पतसंस्थेचा चेअरमन प्रथमेश कट्टेसह दोघांवर फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

(पंढरपुरातील धक्कादायक घटना)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

अल्पावधीत पैसे दुप्पट करण्याचा संकल्प पंढरपूरकरांच्या अंगलट येण्यास सुरुवात झालीय. सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने संकल्प पतसंस्थेचा चेअरमन प्रथेमश सुरेश कट्टे याच्यासह एकावर फसवणुकीचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडालीय.

पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण येथे राहणाऱ्या सुनील दशरथ भिसे या मेकॉनिकच्या ओळखीचा फायदा घेत कट्टेने त्याला टोपी घातलीय.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रथमेश कट्टे हा पंढरीत संकल्प पतसंस्था नावाची संस्था चालवत होता. तीन, सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष तो ग्राहकांना दाखवत असल्याची चर्चा शहरात होती.

सध्या ही पतसंस्था बंद असल्याचं समजते. या संस्थेच्या माध्यमातून सुनील भिसे यांना पंधरा लाख रुपयांचा गंडा कट्टे याने घातला आहे.

 

भिसे यांचे शेती घेण्याचे स्वप्न होते. कट्टे आणि त्याचा एक मित्र शुभम कोरके यांच्याशी फिर्यादीच्या गाडी दुरुस्ती व्यवसाय करण्यावरून ओळख झाली होती.

या ओळखीच्या माध्यमातून भिसे यांनी शेती खरेदी करण्याची इच्छा या दोघांना बोलून दाखवली. याच संधीचा फायदा घेत कट्टे आणि कोरके यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवुन दुप्पट करण्याचे आमिष दाखवले.

यासाठी भिसेला एच.डी.एफ.सी बँकेतून कर्ज मिळवून दिले. दि.9 सप्टेंबर 2019 रोजी भिसेनी 15 लाख रुपये दामदुप्पट करण्याच्या अमिषा पोटी प्रथमेश कट्टेच्या खात्यात जमा केले. त्यानंतर अद्याप कट्टे याने ते पैसे परत केले नाहीत.पैसे मागितल्यावर टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यावर भिसे यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार प्रथमेश कट्टे आणि शुभम कोरकेवर भा द वि 420, 34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

कट्टे याने पंढरपूर व मंगळवेढा शहरातील अनेक लोकांना लाखो रूपयांचा गंडा घातल्याची चर्चा असून बार्शीच्या विशाल फटे घोटाळयाच्या हिशेबात कट्टेचा संकल्प असल्याची चर्चा आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here