पंढरपुरसह पाच तालुक्यांत आजपासून संचारबंदी; व्यापाऱ्यांचा विरोध!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपुरसह पाच तालुक्यांत आजपासून संचारबंदी; व्यापाऱ्यांचा विरोध!

 

सोलापुर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला या पाच तालुक्यात आजपासून संचारबंदी लागू होत आहे. परंतू या संचारबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध आहे.

पंढरपूर व्यापारी महासंघाने संचारबंदीचे आदेश धुडकवात काळे झेंडे लावून दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढण्याचा शक्यता आहे.

पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून, म्हणजेच आजपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 4768 रुग्णांपैकी 4140 रुग्ण हे या पाच तालुक्यातील आहेत.

जाणून घेऊया जिल्हानिहाय आकडेवारी:-

पंढरपूर : 1098 रुग्ण, माळशिरस : 849 रुग्ण, सांगोला : 915 रुग्ण,
माढा : 784 रुग्ण,
करमाळा : 494 रुग्ण

संचारबंदी दरम्यान काय सुरु, काय बंद?

सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात कडक निर्बंध
13 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकानं दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार
अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकानं पूर्णपणे बंद कोणतेही मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी

विवाह सोहळ्यास 50 ऐवजी 25 लोकांना परवानगी,अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात पूर्णपणे संचारबंदी लागू खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतूक सुरु

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here